मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवीन तारीख! MPSC 2020 परीक्षा आता या तारखेला होणार, विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा

नवीन तारीख! MPSC 2020 परीक्षा आता या तारखेला होणार, विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा

 14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं होतं.

14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं होतं.

14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं होतं.

मुंबई, 12 मार्च: मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा  (MPSC Exam 2020) पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत होता. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये देखील कुरबूर पाहायला मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आता एमपीएससी परीक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता 21 मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. याआधी 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2020 पुढे ढकलण्यात आल्याचे 11 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रका नमुद करण्यात आले होती. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च 2021 रोजी संदर्भातील निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. या पत्रात असे म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

आज जारी करण्यात आलेल्या नव्या प्रसिद्धीपत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असं म्हटलं आहे की ही परीक्षा 21 मार्च, 2021 अर्थात महिन्याच्या तिसऱ्या रविवावी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल असे जाहीर केले होते की आठवडाभरात परीक्षा होईल आणि लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल. त्यानुसार आज नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, 14 मार्च रोजी नियोजित परीक्षेकरता विद्यार्थ्यांना जे प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन वितरीत करण्यात आले होते आणि ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होती तेच कायम राहील. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, शनिवार दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसंच रविवार 11 एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray FB live ) यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना MPSC च्या निर्णयाबद्दल मोठी घोषणा केली. येत्या 14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं होतं. त्यांना आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, पुढच्या आठडाभरात परीक्षा निश्चित होईल.

दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं (Coronavirus Pandemic) कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या दीड वर्षांत पाचव्यांदा परीक्षा रद्द झाल्याने किंवा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

First published:

Tags: Mpsc examination, Uddhav thackeray