अभिमानास्पद! जिद्दीने जिंकली लढाई, स्वच्छता कामगाराच्या मुलगा झाला न्यायाधीश

अभिमानास्पद! जिद्दीने जिंकली लढाई, स्वच्छता कामगाराच्या मुलगा झाला न्यायाधीश

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यश खेचून आणणाऱ्या अॅड. कुणाल वाघमारे यांचं अभिनंदन

  • Share this:

सोलापूर, 23 डिसेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा घोषित झाला असून दिवाणी न्यायधीश स्तर (क)प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी अॅड. कुणाल वाघमारे यांचा राज्यात दहावा क्रमांक आला आहे. कुणाल यांनी 200 पैकी 158 गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांकावर येण्याचा मान पटकवला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गात कुणाल यांचा पहिला क्रमांक आल्यानं सोलापुरात आनंदाचं वातावरण आहे. अॅड कुणाल वाघमारे यांची दिवाणी न्यायाधीश (क) स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल सोलापूरसह राज्यभरातून कौतुकाचा वर्षावर होत आहे.

वाचा-रालियाच्या नात्यात ‘ती’ची एंट्री? बहिणीच्या बेस्टफ्रेंडशी वाढतेय रणबीरची जवळीक

'खूप छान वाटतंय, माझं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. आई-वडिलांचे कष्ट आणि त्यांच्या विश्वासामुळे आज इथे पोहोचण्याचं बळ मिळालं. यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर कायम होता. त्यांचा आदर्श ठेवून मी परीक्षेची तयारी केली आणि माझं ध्येय मला गाठता आलं.' अशी प्रतिक्रिया दरम्यान एका चॅनलसोबत बोलताना अॅड. कुणाल वाघमारे यांनी दिली आहे.

कुणाल वाघमारे हे सोलापुरातील आंबेडकर नगर इथले रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. आपल्या मुलानं न्यायाधीश व्हावं अशी त्यांची इच्छा होती. कुणाल यांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण सोलापुरातच केलं. त्यांनी SSW ची पदवी घेतल्यानंतर 2014 साली LLBची परीक्षा देऊन सोलापूर विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तर 2016 साली एलएलएम पूर्ण करून त्यांनी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांची करण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्या अथक महेनतीचं चीज झालं असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे .

न्यायाधीश म्हणून मी जेव्हा काम करेन तेव्हा मी संविधानाला साक्ष ठेवून आणि योग्य न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. पहिल्याच परीक्षेत मी यश फक्त कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर मिळवलं. तुम्ही प्रामाणिक प्रयत्नानं कष्ट केले तर यश तुम्हाला खेचून आणता येतं असा त्यांनी नव तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे.

वाचा-'चाचा जान' एका रात्रीत झाले Rockstar; लतादीदींच्या गाण्यावर धरला ठेका, VIDEO VIRAL

First published: December 23, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading