MPSC परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, या तारखांना होतील स्पर्धापरीक्षा

MPSC परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, या तारखांना होतील स्पर्धापरीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयोगाच्या वेबसाइटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय.

या वेळापत्रकानुसार राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उरलेल्या सगळ्या पूर्व तसंच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचं नियोजित आहे.

राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दिनांक 8 ऑगस्ट ते सोमवार दि. 10 ऑगस्ट, 2020 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्वपरीक्षा 1 मार्च ला तर मुख्य परीक्षा 14 जून 2020 ला घेण्यात येणार आहे.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 साठी जानेवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 12 जुलै 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

Loading...

(हेही वाचा : पाकिस्तानी Whatsapp ग्रुपमध्ये भारतीय सैन्याधिकारी, लष्कराने जारी केला अलर्ट)

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 3 मे 2020 ला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1 - दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक)- दिनांक 13 सप्टेंबर 2020, पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)- दिनांक 27 सप्टेंबर 2020, पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)- दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 साठी मार्च 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्वपरीक्षा दिनांक 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 17 मे 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक‍ 18 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा : नोकरीसाठी आता रोबो घेणार इंटर्व्ह्यू, या बँकेने केली नवी सुरुवात)

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2020 साठी एप्रिल 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 7 जून 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- दि. 29 नोव्हेंबर 2020 रोजी, संयुक्त पेपर क्रमांक 2 (लिपिक-टंकलेखक)- दि. 6 डिसेंबर 2020, संयुक्त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- दि. 13 डिसेंबर 2020 रोजी तर संयुक्त पेपर क्रमांक 2 (कर सहायक)- दि. 20 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2020 साठी मे 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 5 जुलै रोजी तर मुख्य परीक्षा दि. 1 नोव्हेंबर, 2020 रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2020 साठी सप्टेंबर, 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर, 2020 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचं वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

=========================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: careerMPSC
First Published: Nov 22, 2019 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...