मुंबई, 11 मार्च: एमपीएससी परीक्षा (MPSC Exam 2020) पुढे गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पाचव्यांदा रद्द केली गेली आहे. याविरोधात पुणे, सातारा, अमरावती, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सरकारच्या या निर्णयाविरोधात उद्रेक पाहायला मिळतो. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. आंदोलक विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. अवघ्या तीन दिवस अगोदर ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.
आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं (Coronavirus Pandemic) कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे.
(हे वाचा-MPSC Exam: पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, परीक्षा लांबणीवर गेल्याने रास्तारोको)
दरम्यान राज्य सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांनी देखील खडे बोल सुनावले आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत नियोजित वेळेनुसार परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत ही मागणी केली आहे.
यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब आणि @AjitPawarSpeaks दादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2021
विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान कसं भरून निघणार असा सवाल उपस्थित होत आहे. एमपीएससीच्या निर्णयाचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी दिली आहे. एमपीसएससी मंडळानं असा निर्णय घेणं चुकीचा असल्याचं ते म्हणाले.
My quote on postponing MPSC exams. pic.twitter.com/cizLXGdP8r
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 11, 2021
माजी आमदार पंकजा मुंडे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. त्यानी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत असं म्हटलं आहे की, 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे.'
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे. pic.twitter.com/UWe4kDzdJJ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2021
मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam 2020) पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने याबाबत घोषणा केली आहे. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid19, Examination, Maharashtra, Pandemic, Pune, Rohit pawar, Satyajit tambe