मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही; प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊतांचा प्रतिहल्ला, ट्वीट करुन हाणला सणसणीत टोला

शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही; प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊतांचा प्रतिहल्ला, ट्वीट करुन हाणला सणसणीत टोला

'आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या...'

'आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या...'

Sanjay Raut Reaction On Prasad Lad: प्रसाद लाड (Prasad Lad)यांच्यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. लाड यांच्या वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संताप आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 01 ऑगस्ट: वेळ आल्यास शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू, असं वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड (Prasad Lad)यांच्यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. लाड यांच्या वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संताप आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक आणि बोचरी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर मी काय बोलणार. आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना लगावला आहे. रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतला. याव्यतिरिक्त संजय राऊतांनी ट्वीट देखील केलं आहे.

राष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?" असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड काय म्हणाले

भाजप पदाधिकारीच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहिममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहिम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.

आम्ही भाजपच्या कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू , असं वक्तव्य त्यांनी केलं. आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर असतील किंवा मी असेल, आता यापुढे जे बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणत आहे ते पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत. कारण किल्ले फक्त शिवाजी महाराज यांचे आहे. आता यांचे किल्ले आम्ही पाडणार आहोत, बालेकिल्ला वगैरे काही नाही, असंही लाड म्हणाले.

प्रसाद लाड यांच्या विधानावर उदय सामंतांची जोरदार टीका

त्यावेळी जो भाजपचा मतदारसंघ होता, तो अजूनही आपल्यासोबत कायम आहे. आता तर नारायण राणे आणि राणे कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग भाजपसोबत आला आहे. त्यामुळे पुढच्यावेळी नितेशजी आपण कार्यकर्ते कमी आणू, कारण आपण आलो की, पोलीसच पुढे येतात. त्यामुळे त्यांना ड्रेसमध्ये येऊ नका असं सांगूया, म्हणजे, ते हॉलमध्ये तरी बसतील. कारण, एवढी त्यांना भीती आहे की, आम्ही माहीममध्ये आलो तर शिवसेना भवन फोडून काढतील. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू, असं चिथवणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.

First published:

Tags: Sanjay raut, Sanjay Raut (Politician), Shivsena