मुंबई, 02 मे: बाबरी पाडली, मी सहभागी होतो, असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं. यावरुन शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. तसंच यावेळी त्यांनी मनसेवरही (MNS) हल्लाबोल केला आहे.
किती काळ तुम्ही बाबरीच्या विषयावर बोलणार आहात. देशात महागाई, बेरोजगारी, चीनने केलेली घुसखोरी यावरुन लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालीसा आणि बाबरीच्या मुद्द्यावर भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष बोलत आहे. देशातील लोकांचे प्रश्न पाहा ना. बेरोजगारी किती वाढली आहे. महागाई किती वाढली आहे ते पहा, अशा शब्दात त्यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या मेळाव्यात होते? असे ते विचारतात. , ज्यावेळी संपूर्ण बाबरी ढाचा पडला त्यावेळी सगळ्यांनी निर्णय घेतला, कुणी म्हणालं भाजपने पाडलं, व्हिपने पाडलं. सगळ्यांनी सांगितलं श्रेय घ्यायचं कारण नाही. सगळ्यांनी राम सेवकांनी केलेलं काम आहे. मी सुद्धा त्यात होतो, असा खुलासाच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर
बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं, असं राऊतांनी म्हटलं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेलच, अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला हाणला आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर गृहखातं Action Mode मध्ये, कारवाईबाबत गृहमंत्री म्हणतात...
भोंग्यांपेक्षा महत्वाचे विषय आहेत. या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही, असं राऊतांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.