मुंबई, 9 मार्च : आज मनसेचा वर्धापन दिवस आहे. मात्र मनसेच्या वर्धापनदिनीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. हे सर्व शिवसेनेचेच होते. शिवसेना आणि बाळासाहेब नसते तर आपण कुठे असतो याचं आत्मचिंतन या लोकांनी केलं पाहिजे. कितीही संकट आली तरी मुळ शिवसेना जागेवरच असल्यचं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदे फडणवीस सरकारला टोला
दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. एक हिंदुत्ववादी पक्ष यांनी केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करून फोडला. ही वेदना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. राज्यातील जनताच आता ठरवेल यांना माफ करायचं की नाही. राजकारणात मतभेद होत असतात पण यांनी बाळासाहेबांनी तयार केलेला अख्खा पक्षच फोडला. भाजपकडून हात आला तरी तो आता कधीही स्विकारल्या जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भविष्यात भाजपसोबत युती होणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीवर प्रतिक्रिया
नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला आहे. यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं नागालॅंडमध्ये सत्ता स्थापन केलेली नाही. नागालॅंड हे सीमावर्ती राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे. सर्वांनी एकत्रित येऊन हे सरकार बनवलं आहे. असा प्रयोग तिथे या आधी देखील झाला आहे. कारण ती त्या राज्याची गरज आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray, Sanjay raut, Shiv sena