कोल्हापूरकरांचा स्वाभीमान आणि तावडे; संभाजी राजे म्हणतात, यापुढे बोलणार नाही

कोल्हापूरकरांचा स्वाभीमान आणि तावडे; संभाजी राजे म्हणतात, यापुढे बोलणार नाही

'मी व्यक्त केलेल्या भावना म्हणजे कोल्हापूर, सांगलीकरांच्या भावना आहेत. विनोद तावडेंना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. तावडेंबाबत पुढे भाष्य करण्याची इच्छा नाही.'

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 22 ऑगस्ट : खासदार संभाजी राजे आणि सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. तावडेंनी ज्या पद्धतीने कोल्हापूरकरांसाठी मदत गोळा केली होती त्यावर खासदार संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला होता. कोल्हापूरची जनता स्वाभीमानी आहे. त्यांना भीक नको असं त्यांनी तावडेंना ट्विटरवरून सुनावलं होतं. त्याला तावडेंनेही निवेदन काढून संभाजी राजेंना उत्तर दिलं होतं. ती भीक नव्हती तर रस्त्यावरच्या सामान्य माणसांनी प्रेमाने दिलेले पैसे होते, तुम्ही आमच्या भावनांची अवहेलना केली अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर आता संभाजी राजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

ते म्हणाले, मी व्यक्त केलेल्या भावना म्हणजे कोल्हापूर, सांगलीकरांच्या भावना आहेत. विनोद तावडेंना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. तावडेंबाबत पुढे भाष्य करण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरेंची ईडीकडून सुरू असलेली चौकशी हा शासकीय कामकाजाचा भाग, त्यावर भाष्य करणार नाही असंही म्हणाले.

कामचुकार अधिकाऱ्यांना दणका, वेळेत काम झालं नाही तर कापणार पगार

केंद्रीय अर्धसैनिक बलातील भरती प्रक्रियेत मराठी मुलांवर अन्याय करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची गेले काही दिवस चर्चा आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, माझे आणि संभाजी राजेंचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते कुठल्या पक्षात जातात हा त्यांचा निर्णय असेल. मात्र ते कुठल्याही पक्षात गेले, तरी बंधू म्हणून मी त्यांचं स्वागत करेन असंही त्यांनी सांगितलं.

आमच्याकडे होते तेव्हा भ्रष्टाचारी 'बबन्या' आणि भाजपमध्ये गेले की 'बबनराव', व्वा!

रायगड किल्ल्याची वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली. पंढरीच्या वारीलाही वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या