मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : कांदा, चटणी अन् भाकरी; रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला कार्यकर्त्याने आणून दिलेल्या जेवणाचा आस्वाद

VIDEO : कांदा, चटणी अन् भाकरी; रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला कार्यकर्त्याने आणून दिलेल्या जेवणाचा आस्वाद

'कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही.'

'कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही.'

'कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही.'

    रायगड, 28 सप्टेंबर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गाडीच्या बोनेटवर पत्रावळी ठेऊन रस्त्याच्या कडेला जेवणाचा आस्वाद घेतला आहे. 'कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही,' असं म्हणत संभाजीराजेंनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर संभाजीराजे आरक्षणाच्या लढाईचं नेतृत्व करत आहेत. यानिमित्त ते राज्यातील विविध भागात होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या बैठकांनाही हजेरी लावत आहेत. कांदा, चटणी अन् भाकरी...संभाजीराजेंनी सांगितलं नेमकं काय घडलं? "कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही. आज रायगड किल्ल्याच्या कामांची पाहणी करून खाली यायला दुपार उलटली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. रस्त्याच्या कडेला गाडी लावून जेवण करायला संध्याकाळ चे 4:30 वाजले होते. पोट भर जेवण करून, पुन्हा मुंबईला महत्वाच्या बैठकी करीता निघालो आहे. दिल्लीतून निघून, नाशिक मधील राज्यस्तरीय मराठा मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपवून दुसऱ्या दिवशी रायगडला आलो. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून कोल्हापूरला राजवाड्यावर गेलो नाही. रायगड वरून कोल्हापूरला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात असतानाच फोन आला की राजे आपण मुंबईला जाणं अत्यंत महत्वाचे आहे. मला घरी जाणं सुद्धा महत्त्वाचं होतं. पण मी तो पर्याय टाळला आणि मुंबई ला जाण्यासाठी निघालो. समाजाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने मला जाणं भाग आहे. छत्रपती ना स्वतः पेक्षा समाज महत्वाचा असतो,' अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजे यांनी लिहिली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी शेअर केलेला वनभोजनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Raigad, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या