Home /News /maharashtra /

आपण नक्की जिंकू...आत्महत्या हा पर्याय नाही, संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन

आपण नक्की जिंकू...आत्महत्या हा पर्याय नाही, संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन

एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे.

    मुंबई, 1ऑक्टोबर: बीड जिल्ह्यात मराठा समाजातील एका विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. केतूरा गावात ही घटना घडली आहे. 18 वर्षाच्या विवेक कल्याण राहाडे यानं शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे नैराश्येतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा..मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं घेतला गळफास या घटनेनंतर राज्यातीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून मराठा तरुणांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. 'माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत,' असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे. आपण नक्की जिंकू असा विश्वास देखील संभाजीराजे यांनी तरुणांना दिला आहे. आणखी काय म्हणाले संभाजी राजे? खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'बीडमधील विवेक राहाडे या युवकानं समाजासाठी स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरुन निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली.' हेही वाचा...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अखेर मिळवून दिला न्याय! मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहिल. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरु असताना युवकांनी आत्महत्या करु नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही.', असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. ...तर सरकारसहित मंत्र्यांचे नरडे फोडू! बीडमध्ये मराठा तरुणानं आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पुढे मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या झाल्या तर आम्ही सरकारसहित मंत्र्यांचे नरडे फोडू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी रमेश केरे पाटील यांच्या घरावर नजर ठेवणे सुरू केलं आहे...आज पहाटे पासूनच त्यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation, मराठा आरक्षण maratha aarakshan

    पुढील बातम्या