• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी संभाजीराजेंना सांगितला नवा फार्म्युला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी संभाजीराजेंना सांगितला नवा फार्म्युला

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

  • Share this:
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणला स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा बांधव नाराज झाले असून त पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी जवळपास 5 ते 6 फार्म्युले सुचवल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असा आग्रही खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. हेही वाचा...एल्गारप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना केलं जाहीर आवाहन मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास राज्य सरकारच जबाबदार ठरवलं जात आहे. त्यात मराठा संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत खासदार संभाजीराजेंनी शरद पवारांकडे एक आग्रह केला. शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? दरम्यान, तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा सवाल खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणविषयीची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. यासाठी आपण सर्वांना संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...मोठी बातमी! उदय सामंत यांना ABVP च्या पदाधिकाऱ्याकडून धमकीचा फोन? खासदारांना लिहिलं पत्र... खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एक पत्र लिहिले आहे. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33 टक्क्याच्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असंही खासदार संभाजीराजेंनी पत्रात म्हटलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: