मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : उद्धव ठाकरेंनाही भाजपसोबत युती हवीय? राहुल शेवाळेंचा खूप मोठा गौप्यस्फोट

VIDEO : उद्धव ठाकरेंनाही भाजपसोबत युती हवीय? राहुल शेवाळेंचा खूप मोठा गौप्यस्फोट

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 19 जुलै : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांनादेखील भाजपसोबत युती हवी आहे. त्यांनी सर्व खासदारांना तसं सांगितल्याचा दावा शेवाळे यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी खूप प्रयत्न केल्याचं त्यांनी स्वत: खासदारांना सांगितलं होतं. पण भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याने युती होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी खासदारांना युतीसाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले?

आमदारांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना उद्धव ठाकरे यांनी बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. सर्व खासदारांनी गेल्या महिन्यात 21 जूनला पक्षासोबत राहू, असं सांगितलं होतं. पण आम्ही त्यावेळी आमची भूमिका मांडली होती. आम्ही एनडीएच्या युतीतून निवडणूक लढवली आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचा त्रास होतोय, अशी भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली होती. ठाकरेंनी आमची भूमिका मान्य केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर निश्चितच त्या निर्णयाचं मी स्वागत करेन, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत हे देखील होते", असा मोठा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला.

"उद्धव ठाकरेंनी आम्हाला बैठकीत सांगितलं होतं की, मी सुद्धा माझ्यापरिने युती करण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो त्यावेळी मोदी यांच्यासोबत एक तास चर्चा झाली. या चर्चेत युतीविषयी चर्चा झाली. ही बैठक गेल्यावर्षी जूनला झाली. त्यानंतर जुलैला अधिवेशन झालं. पण त्या अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर कारवाई झाली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटलं की, एकीकडे युतीचे प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे अशाप्रकारची कारवाई करायची. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी युतीसाठी प्रयत्न झाले पण भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याने ती गोष्ट तेव्हा घडू शकली नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. माझ्या परिने मी युतीचे सर्व प्रयत्न केले. आता तुम्ही देखील प्रयत्न करा. त्यानंतर मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो", असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.

"वारंवार युतीच्या चर्चा करुन जे कमिटमेंट झालं होतं त्याची पूर्तता न केल्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नाराज होते. आमच्या उद्धव ठाकरेंसोबत चार-पाच बैठका झाल्या. या बैठकांमध्ये युती करण्याबाबत चर्चा झाल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे स्वत: म्हणाले की मी युती करायला तयार आहे. पण मला हवं तसं भाजपकडून सहकार्य मिळत नाही. आम्ही त्यामुळे युतीसाठी प्रयत्न करत होतो. पण हे एकेकाळी सुरु असताना दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडून राष्ट्रपती निवडणुकीत युपीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतचं विधान करण्यात आलं. त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाली. एकीकडे आमच्याकडे युतीच्या चर्चा होत्या. आमच्याकडून युतीच्या चर्चा सुरु असताना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी असताना राज्यावर अन्याय झाला. त्यामुळे खासदारांमध्ये नाराज झाली. आम्ही एनडीएसोबत जाण्यासाठी प्रयत्न केले. पण उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे", अशी भूमिका राहुल शेवाळे यांनी मांडली.

(शिंदेंच्या 'मॅटिनी'शोच्या टीकेवर राउतांचं 'इव्हनिंग शो'चं उत्तर, शेवाळेंच्या गौप्यस्फोटावरही मोठं विधान)

"उद्धव ठाकरेंनी जो वचननामा लिहिला होता त्याच वचननाम्यावरुन आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आम्ही प्रचंड मतांनी विजयी झालो. पण दुर्देवाने नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. या महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवण्यात आला. या प्रोग्रॅममध्ये शिवसेनेच्या वचननाम्याबद्दल काहीच नव्हतं. संभाजीनगर विषयी कॉमन मिनिमम प्रोगॅममध्ये कुठेही उल्लेख नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व खासदार इथे उपस्थित आहोत. आम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे", असं राहुल शेवाळे म्हणाले.

First published:

Tags: Eknath Shinde, Rahul shewale, Shiv sena