मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला प्रीतम मुंडेंनी झापलं, भर सभेत सुनावले खडेबोल

निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला प्रीतम मुंडेंनी झापलं, भर सभेत सुनावले खडेबोल


'समजा एखादा सभामंडप असेल, तुम्ही 2 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहिली असेल, आणखी 10 मिनिटं वाट पाहा की...

'समजा एखादा सभामंडप असेल, तुम्ही 2 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहिली असेल, आणखी 10 मिनिटं वाट पाहा की...

'समजा एखादा सभामंडप असेल, तुम्ही 2 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहिली असेल, आणखी 10 मिनिटं वाट पाहा की...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 26 सप्टेंबर : 'आपल्या जिल्ह्याची मानहानी होईल असं वागू नका. 2 वर्ष एखाद्या सभा मंडपासाठी वाट पाहिली असेल तर आणखी 10 मिनिटं वाट पाहिली तर काय होईल ? मला आतापर्यंत तरी अशी सिद्दी प्राप्त नाही झाली, की मी जिफकरून डायरेक्ट गाडीत बसेल. मला देखील स्टेज खाली येऊनचं गाडीत बसायचंय' असं म्हणत फंडासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी जाहीर भाषणांमधून चांगलेचं खडसावले.

बीड शहरात खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रीतम मुंडे यांच्याकडे एक कार्यकर्ता निधीबाबत निवेदन घेऊन आला होता. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी भाषणातून या कार्यकर्त्याला चांगलेच फैलावर घेतली.

('तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले', शिवसेनेची शिंदे गटावर जळजळीत टीका)

'की मंचावर आपण बसलेलो असतो, असं नाही की तुम्हाला माझं दर्शन खूप लेट होतं. दर आठवड्याला मी येत आहेच. निवेदन..मागण्या.. पत्र.. फंडाचे पत्र..ताई या कार्यक्रमासाठी यायचंय, यासाठी तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकता. आपल्या इथं कार्यक्रमाला बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळीचे भाषण सुरू असताना, आपण फंडाचं पत्र मागणं योग्य आहे का? असा सवाल करत प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले.

तसंच, आपण आयोजक असताना, संयोजक असताना, यजमान असताना आपण पाहुणे मंडळींचा अशा प्रकारे निरादार करणं योग्य नाही. लोक जेव्हा आपल्या जिल्ह्याविषयी चर्चा करतांना मानहानी होईल, असं वागू नका, असंही त्यायावेळी म्हणाल्या.

('...म्हणून महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर जात आहेत', रोहित पवारांचा भाजपवर आरोप)

'समजा एखादा सभामंडप असेल, तुम्ही 2 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहिली असेल, आणखी 10 मिनिटं वाट पाहा की, मी भाषण संपल्यानंतर स्टेजच्या खालीच येणारचं आहे. अजून मला अशी सिद्दी प्राप्त झाली नाही, की मी स्टेजवरून जिफ करत थेट गाडीत जाईल. मला स्टेजच्या खाली यावं लागेल. मग गाडीत बसेल, असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्याला चांगलेच खडेबोल सुनावले.

प्रीतम मुंडे यांनी भाषणामध्ये कार्यकर्त्याला सुनावल्यामुळे इतर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. प्रीतम मुंडे यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच उलट सुलट चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

First published: