• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मोठी बातमी! तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त; महाराष्ट्र - मध्यप्रदेशात सुरु होता गोरखधंदा, नक्षली कनेक्शनचा संशय

मोठी बातमी! तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त; महाराष्ट्र - मध्यप्रदेशात सुरु होता गोरखधंदा, नक्षली कनेक्शनचा संशय

मध्यप्रदेशमधील बालाघाटमध्ये पोलिसांनी तब्बल 5 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या नोटांचा नक्षलवादाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 • Share this:
  गोंदिया, 27 जून : मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) बालाघाटमध्ये (Balaghat) पोलिसांनी तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा (Fake Notes) जप्त केल्या आहेत. यामध्ये 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत सर्व किंमतीच्या बनावट नोटा असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी 8 जणांना अटक (8 arrested) करण्यात आली असून मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया (Gondia) भागात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींपैकी 6 बालाघाटचे तर 2 गोंदियाचे रहिवासी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. अशी झाली कारवाई मध्यप्रदेशमधील बालाघाट पोलिसांना बनावट नोटांचं व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची टीप सूत्रांकडून मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर बालाघाट आणि गोंदिया या भागात हे रॅकेट कार्यरत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी गुप्त मोहिम राबवत एका आरोपीला 8 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं बालाघाट आणि गोंदियातील ठिकाणांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून बालाघाट पोलिसांनी 8 जणांना अटक केली. मार्च महिन्यातही पकडलं होतं रॅकेट पोलिसांनी या वर्षीच्या मार्च महिन्यातही बनावट नोटा खपवण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 94 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. आताच्या 5 कोटींच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा त्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत. हे वाचा - शमीच्या पत्नीने 'वन-पीस' मध्ये शेयर केला PHOTO, धर्माच्या नावावर झाली ट्रोल सर्व चलनातील बनावट नोटा पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांमध्ये 10 रुपयांच्या नोटेपासून ते अगदी 2 हजार रुपयांच्या नोटेपर्यंत सर्व चलनाच्या बनावट नोटा आहेत. यामध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या अधिक असून यासाठी कलर प्रिंटर किंवा स्कॅनरला वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. बनावट नोटांचं नक्षल कनेक्शन या नोटांचा वापर नक्षलवाद पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर आणि गोंदिया या भागात या प्रकऱणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशात झालेली बनावट नोटांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
  Published by:desk news
  First published: