मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'लग्न झाल्यावर मुलीच्या आईने..' खा. नवनीत राणांनी सांगितला घटस्फोट टाळण्याचा उपाय

'लग्न झाल्यावर मुलीच्या आईने..' खा. नवनीत राणांनी सांगितला घटस्फोट टाळण्याचा उपाय

खा. नवनीत राणांनी सांगितला घटस्फोट टाळण्याचा उपाय

खा. नवनीत राणांनी सांगितला घटस्फोट टाळण्याचा उपाय

केवळ जगातच नाही तर भारतासारख्या देशात घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. यावर आता खासदार नवनीत राणा यांनी उपाय सांगितला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमरावती, 8 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून तुम्ही घटस्फोटाच्या अनेक बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांचे घटस्फोट तुम्हाला माहित असतील. पण, अलीकडच्या काळामध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण अचानक वाढल्याने जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. अमरावतीच्या खासदार नवीनत राणा यांनी यावर उपाय सांगितला आहे. लग्न झाल्यावर मुलींच्या आईने मुलीच्या संसारात ढवळा ढवळ करू नये, असा सल्ला खासदार राणा यांनी दिला आहे.

तर घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल : खासदार नवनीत राणा

मुलीचे लग्न झाल्यावर मुलीची आई दुसऱ्या दिवसापासून मुलीला फोन करून तिथली विचारपूस करते आणि तिच्या संसारात ढवळाढवळ करते. त्यामुळे अनेक मुलींचे संसार उध्वस्त झाले आहे. परिणामी मुलीच्या आईने किमान 2 वर्षेपर्यंत तिच्या संसारात इंटरफेअर न करता मुलीने तिच्या संसाराची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आईला सांगितलं पाहिजे मी सक्षम आहे. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल, असे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथे केले. धनगर समाज वधुवर परिचय मेळाव्यात खासदार राणा बोलत होत्या. यावेळी खासदार अनिल बोंडे, खासदार विकास महात्मे, ऍड. दिलीप एडतकर उपस्थित होते.

वाचा - कुंडलीतील या कारणांमुळेही होतो विवाहात विलंब, करून पहा चमत्कारिक हे उपाय

भारतात घटस्फोटाची स्थिती कशी आहे?

सध्या जगाच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी आहे, या वस्तुस्थितीसाठी भारत अभिमानाने आपली पाठ थोपटून घेऊ शकतो. अमेरिका आणि विकसित देशांमध्ये, जिथे त्याची टक्केवारी तीसपर्यंत आहे, भारतात ती फक्त 1.3 टक्के आहे. म्हणजेच एक हजार जोडप्यांमध्ये 13 घटस्फोट. मात्र, या प्रकरणात आता देशाच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटू लागल्या आहेत. जिथे जागतिक उदारीकरणापूर्वी हा दर 0.5 टक्के होता, तो 2019 मध्ये 1.3 इतका वाढला आहे.

प्रेम विवाह असो की अरेंज्ड

घटस्फोटाच्या या वाढत्या परिस्थितीला समाजशास्त्रज्ञांनीही 'प्रेमविवाह' हे प्रमुख कारण मानले आहे. दोन कुटुंबांच्या परस्पर संबंधांबाबत ते म्हणाले की, असे नातेसंबंध निर्माण होण्याची प्रक्रिया जितकी गुंतागुंतीची आहे, तितकीच त्यातून बाहेर पडणे अवघड असते. अ‍ॅरेंज्ड मॅरेजमध्ये दोन्ही पक्षांचे कुटुंब, नातेवाईक आणि अगदी संपूर्ण समाज सामील असल्याने या सर्वांच्या दबावामुळे हे वैवाहिक जीवन तुटण्यापासून वाचण्यास मदत होते.

First published:

Tags: Marriage, Navneet Rana