मुंबई, 08 मे: खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज (discharged) मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) दिसली. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray government) कडाडून टीका केली आहे.
ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. महापालिका निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. राम, हनुमानाचा विरोध केल्याची शिक्षा निवडणुकीत त्यांना मिळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
रवी राणा संतापले; संजय राऊतांवर जोरदार टीका, म्हणाले, ''चवन्नीछाप माणूस''
समर्थकांकडून नवनीत राणांना हनुमानाची मूर्ती देखील देण्यात आली. रुग्णालयाच्या बाहेर येताच 'हनुमान चालिसा म्हणणं हा गुन्हा आहे का?' असा सवाल करत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी अशी कोणती चूक केली? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. 14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकलं तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.
लिलावती रुग्णालयाबाहेर राणा यांच्या सर्मथकांनी श्रीरामाचे नाव असलेली शाल पांघरून नवनीत राणांचे स्वागत केलं आहे. खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
4 मे रोजी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर
नवनीत राणा आणि रवी राणा यांना (Navneet Rana and Ravi Rana) जामीन मिळाला. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलम 153A आणि 124A विरोधात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला.
या पाच अटींवर जामीन मंजूर
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यनंतर पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयानं घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई असेल. तसंच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयानं दिलेत. या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीह एक अट न्यायालयाकडून घातली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) अमरावतीहून मुंबईत आले. त्यानंतर झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.