मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खासदार नवनीत राणांचा सुपर सुपर परफॉर्मन्स, धरला गुजराती गाण्यावर ठेका, VIDEO

खासदार नवनीत राणांचा सुपर सुपर परफॉर्मन्स, धरला गुजराती गाण्यावर ठेका, VIDEO

 तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  sachin Salve

अमरावती, 27 सप्टेंबर : नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी आता रास गरब्याचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी दांडियावर तरुणाईने ठेका धरला आहे. खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यावेळी नवनीत राणा यांचा गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. नवनीत राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. गुजराती आणि हिंदी गाण्यावर ठेका धर खासदार नवनीत राणा यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का धरला.

कसा खेळला जातो दांडिया?

रंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते. स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात. रंगीबेरंगी पोशाख आणि दागिने घालून महिला या नृत्यात सहभागी होतात.

(Navratri 2022: नवरात्रीत न थकता गरबा खेळायचाय? निरोगी शरीर अन् सौंदर्यासाठी फॉलो करा खास टिप्स)

तर पुरुष पारंपरिक पगडी, धोतर असा पोशाख परिधान करतात. या पोशाखांवर काचांचे तुकडे, लोलक किंवा मोती इ.चा वापर करून नक्षीकाम केले जाते आणि या पोशाखांचे सुशोभीकरण केले जाते. दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य नवरात्रात केले जाते.

दांडियाचे प्रकार

अनेक प्रकारचा दांडिया खेळला जातो. हल्ली फ्युजन स्टेप्स बनवून सोप्या पद्धतीने दांडिया खेळतात. पोपटीयो, हुड्डा, हिच तसेच गुजरातमधील गावांच्या नावावरून देखील दांडियाचे प्रकार पहायला मिळतात.

First published: