सिंधुदुर्ग, 19 सप्टेंबर : राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रवेशाच्या तारखेबद्दल भाजपमधून अद्याप कोणी जाहीर भाष्य केलं नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाचा पुनरुच्चार केला आहे. येत्या आठ दिवसात आपला भाजपा प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. माझं बोलणं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी झालेलं आहे. मला भाजपचे नेते पक्षात प्रवेश देणार आहेत,' असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे.
नितेश राणेंनी भूमिका बदलली?
'नाणार रिफायनरीबाबत आजही आपण जनतेच्या सोबत असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता म्हणूनच आम्हीही विरोधात होतो. पण आता लोकांचं म्हणणं काही वेगळं असेल तर लोकांशी चर्चा करूनच आपण तशी पावलं टाकू,' असा पवित्रा आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यानी राजापूरचा सभेत केलेल्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी ही सावध प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे आधी नाणारवरून आक्रमक भूमिका घेणार नितेश राणे मवाळ कसे झाले, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
VIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा