खळबळजनक! MP काँग्रेस नेत्याची बायको 2 मुलांसह पक्षातीलच दुसऱ्या नेत्यासोबत पळाली

खळबळजनक! MP काँग्रेस नेत्याची बायको 2 मुलांसह पक्षातीलच दुसऱ्या नेत्यासोबत पळाली

एकाच पक्षातील नेत्याने दुसऱ्या नेत्याची बायको पळवून नेल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

इंदौर, 6 फेब्रुवारी : राजकीय पक्षांमध्ये आयाराम-गयारामांची काही कमी नसते. निवडणुका तोंडावर आल्यावर तर थेट दुसऱ्या पक्षातील नेत्यांची पळवा-पळवीच सुरू होते. मात्र आता एकाच पक्षातील नेत्याने दुसऱ्या नेत्याची बायको पळवून नेल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमधून हा प्रकार समोर आली आहे.

इंदौरमधील काँग्रेस नेत्याची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन गायब झाली आहे. संबंधित काँग्रेस नेत्याने भरपूर शोधाशोध केली, मात्र पत्नी सापडली नाही. त्यानंतर या काँग्रेस नेत्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या फुटेजमधून खळबळजनक खुलासा झाला आहे. काँग्रेस नेत्याची पत्नी काँग्रेसमधीलच दुसऱ्या नेत्याच्या बाईकवर बसून जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर काँग्रेस नेत्याने पक्षातील दुसऱ्या नेत्यावर बायकोला पळवल्याचा आरोप केला आहे. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काँग्रेसचा नेता आपली तक्रार घेऊन भंवरकुआं येथील पोलीस स्थानकात दाखल झाला. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा या नेत्याचा आरोप आहे.

यातही पुणे पुढेच का? चाईल्ड पार्नोग्राफीच्या तब्बल 150 VIDEO झाले अपलोड, दोघांना अटक

पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने संबंधित काँग्रेस नेता थेट भोपाळच्या काँग्रेस मुख्यालयात पोहोचला. त्याने आपलं सर्व गाऱ्हाणं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर घातलं. घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या नेत्याला इंदौर डीआयजी रूचि वर्धन शर्मा यांच्याकडे पाठवलं आहे. आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने काही कारवाई होते का, हे पाहावं लागेल.

First published: February 6, 2020, 8:28 PM IST

ताज्या बातम्या