पूरग्रस्त भागासाठी 5 कोटी खर्च करणार, संभाजीराजेंची घोषणा

पूरग्रस्त भागासाठी 5 कोटी खर्च करणार, संभाजीराजेंची घोषणा

छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण 5 कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगली भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यानंतर आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण 5 कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.

'माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे,' असं ट्वीट करत छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना संकटातून सावरण्यात आपण हातभार लावणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावोगावी मदत उभी केली जात आहे. यामध्ये कोणताही समाजघटक मागे नाही. अनेक भागातील मुस्लीम समाजाने आज ईदवरील खर्च टाळत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.

मुस्लीम समाजाचा संकल्प

कोल्हापुरात पूर आल्यानंतर महाराष्ट्रात माणुसकीचा महापूर आला आहे. समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने यंदाच्या बकरी ईदला आर्थिक कुर्बानी करण्याचा निश्चय केला आहे.

VIDEO :'..म्हणून ए चूप बसायचं' म्हटलो, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या