मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्षभरानंतर खा. गवळींना जिल्ह्यावासियांची आठवण; शिवसैनिक म्हणतात पुन्हा ED...

वर्षभरानंतर खा. गवळींना जिल्ह्यावासियांची आठवण; शिवसैनिक म्हणतात पुन्हा ED...

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी तब्बल वर्षभरानंतर आज शनिवारी प्रथमच यवतमाळात येथे आल्या.

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी तब्बल वर्षभरानंतर आज शनिवारी प्रथमच यवतमाळात येथे आल्या.

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी तब्बल वर्षभरानंतर आज शनिवारी प्रथमच यवतमाळात येथे आल्या.

  • Published by:  Rahul Punde
यवतमाळ, 13 ऑगस्ट : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात एक मोठं सत्तानाट्य सुरू झालं. या सत्तानाट्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेना कोणाची? यावरुन वाद सुरू झाला आहे. यात आमदारानंतर खासदारांनीही ठाकरेंची साथ सोडली. यात शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आघाडीवर होत्या. राज्यात सत्तानाट्य सुरू झाल्यापासून भावना गवळी गायब होत्या. हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी या गेल्या दहा महिन्यापासून जिल्ह्यात फिरकल्या नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी जिल्ह्यात प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र, आज त्या यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाल्या असून बाबुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. अखेर भावना गवळींना जिल्हावासियांची आठवण अलीकडे वर्षभरापासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरे जावं लागतं आहे. गेल्या वर्षी तर पिकंही हाती सापडलं नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला होता. या वर्षी तर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडेच मोडले. कापूस, तूर, सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेच्या होत्या. मात्र, त्यांनी जवळपास वर्षभरापासून जिल्ह्याकडे पाठच फिरविली असून आपल्या मतदारांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत रोष निर्माण झाला होता. दरम्यान, वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या खासदार आज उगवल्याने त्यांच्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खासदार गवळींच्या विरोधात शिवसेना आक्रमक शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आज शनिवारी प्रथमच यवतमाळात येत आहे. त्यांचा निषेध म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्थानिक दत्त चौकात आंदोलन करण्यात आले. शिंदे गटात जाण्यापूर्वी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीने बेजार असलेल्या भावना गवळी गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातून भूमिगत होत्या, असा आरोप या आंदोलनावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतःवरील ‘ईडी’ची कारवाई टाळण्यासाठी शिवसेनेशी गद्दारी करून त्या शिंदे गटात सामील झाल्या, असा आरोप शिवसैनिकांनी केला. यावेळी त्यांची पुन्हा ईडी चौकशीची मागणी करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीच्या समन्वयक सागर पुरी, जिल्हा संघटिका यवतमाळ मंदा गाडेकर, कल्पना दळवी, शहर प्रमुख अंजली गिरी तालुकाप्रमुख संगीता पुरी आदींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. याचवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक फाडून राठोड यांचा निषेध नोंदवला.
First published:

Tags: Shivsena, Yavatmal

पुढील बातम्या