शिवनेरी गडावर आता साजरा होणार डॉ.अमोल कोल्हेंच्या स्वप्नातील शिवजन्मोत्सव

शिवनेरी गडावर आता साजरा होणार डॉ.अमोल कोल्हेंच्या स्वप्नातील शिवजन्मोत्सव

देशभरात सगळ्यात मोठा शिवजन्मोत्सव म्हणून याकडे पाहिलं जाईल, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगिलले आहे.

  • Share this:

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

जुन्नर, 24 मे- किल्ले शिवनेरीवर आगळा वेगळा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याचे 30 ते 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. देशभरात सगळ्यात मोठा शिवजन्मोत्सव म्हणून याकडे पाहिलं जाईल, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगिलले आहे.

डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, या पुढच्या काळात किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव भरावण्याचा एक वेगळा विचार आहे. हा महोत्सव केवळ शिवजयंती किंवा शिवजन्मतिथीला धरून नसेल. शिवाजी महाराजांचा संपूर्ण शिवचरित्र जागवणारा वेगळा शिवजन्मोत्सव असेल. याबाबत 30 ते 40 टक्के काम अगोदरच झाले आहे. त्याचे मूर्त रूप लवकरच बघायला मिळेल.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या विजयानंतर शुक्रवारी किल्ले शिवनेरी गडदेवता शिवाई देवीचे दर्शन घेत शिवजन्मस्थानास अभिवादन केले. शिवकुंज येथील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. निवडणूक प्रचाराचा प्रारंभही डॉ.कोल्हे यांनी शिवनेरीवर दर्शन घेऊनच केला होता. यानंतर विजयी ठरल्यावर त्यांनी शिवनेरीवर हजेरी लावली. डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन पुढील कामाला सुरुवात केली.

डॉ अमोल कोल्हे यांनी दिले 'त्या' प्रश्नाचे उत्तर..

निवडणूक प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करणार, असा प्रश्न विचारला जात होता. त्या प्रश्नाला डॉ.कोल्हे यांनी विजयानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर दिले. शिरुर लोकसभा मतदार संघाची 'शिवभूमी' म्हणून एक वेगळी ओळख आहे. या शिवभूमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल. या शिवजन्मोत्सवाची चर्चा संपूर्ण देशात असेल, असेही यावेळी डॉ.कोल्हे यांनी सांगितले.

VIDEO : क्लासला लागली आग, मुलींनी टाकल्या खिडकीतून उड्या

First published: May 24, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading