सातारा, 25 ऑक्टोबर: एका चालत्या एसटी बसनं पेट (ST bus caught Fire) घेतल्यानं एकच गोंधळ उडाला. कोल्हापूरहून (Kolhapur) पुण्याकडे (Pune) जात असताना एसटी बसला (ST bus) हा अपघात झाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झालेलं नाही.
एसटी बसला भीषण आग pic.twitter.com/BSdQVEL8SB
— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2021
रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उडतारे गावच्या हद्दीत आनेवाडी टोलनाक्या जवळ चालत्या एसटीनं पेट घेतला. राज्य परिवहन महामंडळाची ही एसटी बस कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं जात होती. या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा- ''मला ड्रग्ज प्रकरणात...'', समीर वानखेडे यांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, केली विनंती
कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली कोल्हापूर-अर्नाळा (MH 09 FL 09983) ही एसटी रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. या बसस्थानकात काही वेळ बस थांबल्यानंतर ही गाडी साडेनऊच्या सुमारास पुण्याच्या दिशेनं रवाना झाली. गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आल्यानंतर बसमध्ये शॉर्टसर्किट झालं आणि अचानक आग लागून धूर येऊ लागला.
बसमधून धूर येत असल्याचं चालकाचं लक्षात आलं त्यानं तात्काळ बस महामार्गाच्या कडेला लावली. त्यानंतर लगेचच बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे.
हेही वाचा- ट्रकच्या धडकेनं टँकर पलटी, आगीचा उडाला भडका, 2 जणांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.