मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या', शिवसैनिकांचं संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज

'हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या', शिवसैनिकांचं संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज

'हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या', शिवसैनिकांचं संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज

'हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या', शिवसैनिकांचं संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज

'कधी कोणत्या दिवशी यायचे मी चौकात उभा आहे' असे म्हणून संतोष बांगर यांनी शिवसेनेला डिवचले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 27 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर अमरावतीत राजकीय वातावरण तापलं आहे. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना ओपन चॅलेंज केलं होतं. आता शिवसैनिकांनी बांगर यांचं चॅलेंज स्वीकारलं असून हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या, असं आव्हानच केलं आहे.

अमरावतीमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि शिवसैनिकांमध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. संतोष बांगर यांनी अमरावतीच्या शिवसैनिकांना आव्हान केलं होतं, 'कधी कोणत्या दिवशी यायचे मी चौकात उभा आहे' असे म्हणून संतोष बांगर यांनी शिवसेनेला डिवचले होते.

आता शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी संतोष बांगर यांचं आव्हान स्वीकारत त्यांना चॅलेंज केलं आहे. हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला सारून समोर यावं व कधी येता किती लोक घेऊन येता वेळ काळ ठरवा, तेव्हा दाखवेल तुम्हाला ओरिजनल बाळासाहेबांचा शिवसैनिक कोण आहे, पोलिसांना मध्ये टाकू नका' असं थेट आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी संतोष बांगर यांना दिलं.

आम्ही आमच्या भगव्याला वाचवलं - गुलाबराव पाटील

दरम्यान, संतोष बांगर यांच्यावर झालेला हल्ला हा एकदम चुकीचा असून हे तर सर्वांनाच करता येतं आणि आम्ही हे तर लहानपणापासूनच करत आलो आहे. मात्र संघर्षाने काही होत नाही, दोन वर्षांनी पुन्हा निवडणुका आहे तुम्हाला वाटत असेल तर लोकशाहीचा मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजेच मतदान तुम्हा सर्वांना वाटत असेल की हे लोक चुकीचे आहे. आम्ही आमच्या भगव्याला वाचवलं आहे आणि भगवा वाचवण्याकरताच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं म्हणत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संतोष बांगर यांची पाठराखण केली आहे.

'आज या देशामध्ये जे पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात तेच आपल्या छातड्यावर पुण्यामध्ये बोलत आहे. त्यांच्याकडे कोणाची दात उठत नाही आणि आज आम्ही भगवा वाचवण्याकरता भाजप बरोबर गेलो आहोत तर आमच्या गाड्यांवर हल्ला करत आहेत. हे करणं चुकीचे आहे त्याचा मी निषेध करतो. याच्याने असं वाटेल की, आम्ही 40 लोक घाबरून जाऊ पण मात्र असं म्हणतात की, अली बाबाचे 40 चोर हे चोऱ्या करायचे तर आम्ही भगवा वाचवण्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी आमच्या पासून चोरी करत होती त्यातून आम्ही बाहेर पडलो आहोत असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

First published: