नाशिकमध्ये मुलाने केला जन्मदात्या आईचा खून, हे होते कारण...

नाशिकमध्ये मुलाने केला जन्मदात्या आईचा खून, हे होते कारण...

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने चक्क जन्मदात्या आईचा खून केला आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)

नाशिक, 24 जुलै- नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने चक्क जन्मदात्या आईचा खून केला आहे. या धक्कादायक घटनेने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. कमलाकर काळे असे आरोपी मुलाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, नाशिकच्या सातपूर परिसरातील राजवाड्यात कांताबाई काळे (वय-82)या आपल्या मुलांसोबत राहत होत्या. काही दिवसांपूर्वी कांताबाई यांचा मुलगा हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. मात्र, मुलाच्या या वाईट सवयीला आईने विरोध केला. कांताबाई यांनी कमलाकरला पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी मुलाने कांताबाई यांना बेदम मारहाण केली होती. आरोपी कमलाकर याने लहान भावालाही मारहाण केली होती. कांताबाई गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान कांताबाई यांचा मृत्यू झाला.

पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले की, या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कमलाकर काळे याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सातपूरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे.

शाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने दोन मुलांना पाजले विष

नाशिकमध्ये अशीच एक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या बापानेच आपल्या दोन मुलांना विष पाजल्याची संतापजनक घटना शिंदे पळसे या गावात घडली होती. शाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलांना विष पाजले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश बोराडे आणि निकिता बोराडे या दोन्ही मुलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. शाळेसाठी लागणारी वही, पुस्तक, दप्तर मागितल्याने नराधम बापाने आपल्या मुलांना विष पाजले. ऋषिकेश बोराडे याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी पंढरीनाथ बोराडे या नराधम बापाला अटक केली आहे.

VIDEO: जिवाशी खेळ! नागपंचमीला येथे अंगाखांद्यावर खेळतात विषारी साप

Published by: Sandip Parolekar
First published: July 24, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading