आईने मुलांसमोर घेतला गळफास, दारं-खिडक्या बंद असल्यामुळे 2 चिमुकल्यांचाही गुदमरून मृत्यू!

आईने मुलांसमोर घेतला गळफास, दारं-खिडक्या बंद असल्यामुळे 2 चिमुकल्यांचाही गुदमरून मृत्यू!

गंभीर म्हणजे आत्महत्या करण्यासाठी आईने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि गळफास लावून घेतला. पण यामध्ये लहान मुलांचा घरात गुदमरून मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 30 ऑगस्ट : दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्धामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाल्यामुळे घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तम वर्धा स्टील कॉलनीमध्ये हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. आईने नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत आहेत.

गंभीर म्हणजे आत्महत्या करण्यासाठी आईने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि गळफास लावून घेतला. पण यामध्ये लहान मुलांचा घरात गुदमरून मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. सविता आशिष साहू (31), आयुष आशिष साहू (3), ओरा आशिष साहू (9) अशी मृतांची नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

घरात काहीतरी घडलं असल्याची शेजाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी सावंगी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती मिळवली. त्यात मुलांचा श्वास कोंडल्याने तर महिलेचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या - 'तेरी मेरी कहानी'नंतर हिमेशाच्या सिनेमासाठी रानूनं गायलं दुसरं गाणं, पाहा VIDEO

पोलिसांनी घटनास्थळावरून आई आणि 2 चिमुकल्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सविता यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास करण्यासाठी पोलीस साहू कुटुंबियांची चौकशी करणार आहेत. तर शेजाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं  आहे.

SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या