क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

औरंगाबादमध्ये दुसरा मुलगा झाला म्हणून त्याचा खून करण्यात आला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 25 जून : औरंगाबादमध्ये दुसरा मुलगा झाला म्हणून त्याचा खून करण्यात आला आहे. सहसा मुलगी झाली म्हणून तिला रस्त्यावर फेकून देणं किंवा तिला मारून टाकणे या घटना पाहिल्या असतील मात्र दुसरा मुलगा झाला म्हणून त्याला मारून टाकल्याची धक्कादायक औरंगाबादमध्ये घटली आहे.

ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. दुसराही मुलगाच झाला म्हणून पैठणमधील मातेने आपल्या 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून त्याचा जीव घेण्यात आला आहे. सुरवातीला बाळ गायब झालं म्हणून तक्रार दिली मात्र सकाळी बाळ पिंपात मृतावस्थेत सापडलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

LIVE मुसळधार पावसामुळे मुंबईचे हाल, सखल भागात साचलं पाणी, रेल्वे रूळ पाण्याखाली

पिंप उंच असल्याने बाळ त्याच्यात पडू शकत नाही त्यामुळे त्याला कुणीतरी पिंपात टाकले असा पोलिसांनी कयास बांधला. आणि दरम्यान तपासाअंतर्गत बाळाच्याच आईने त्याला पिंपात टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या क्रुर आईला ताब्यात घेतलं आहे.

मुलीच्या हव्यासापोटी आईने स्वत:च्या पोटच्या मुलाचा जीव घेतला आहे. मुलगा असो वा मुलगी असं अमानवी कृत्य करणं म्हणजे माता न तू वैरिणी असंच म्हणावं लागेल.

हेही वाचा...

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान

First published: June 25, 2018, 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading