मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

किती हा निर्दयीपणा, अवघ्या दीड महिन्याच्या बाळाला रेल्वेच्या डब्ब्यात सोडून आई पसार

किती हा निर्दयीपणा, अवघ्या दीड महिन्याच्या बाळाला रेल्वेच्या डब्ब्यात सोडून आई पसार

बाळाला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बाळाला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बाळाला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बीड, 08 नोव्हेंबर : 'माता न तू वैरणी' या वाक्याचा प्रत्यय बीडमध्ये (beed) पाहण्यास मिळाला आहे. एका अज्ञात मातेनं दीड महिन्याच्या बाळाला (baby ) एक्स्प्रेसमध्ये (train) टाकून पसार झाली. मन हेलावून टाकणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या निर्दयी मातेविरोधात (mother) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. नांदेड-बंगळुरू एक्सप्रेस गाडीमध्ये अज्ञात मातेने दीड महिण्याचे बाळ सोडून पळ काढल्या ची धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. परळी रेल्वे स्टेशनवर गाडी आली असताना गाडीच्या कोच नंबर एस २ मध्ये एकाच सीटवर सुमारे एक ते दीड महिने वयाचे एक बाळ बेवारस अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या बाळाच्या मातेचा तपास केला असता कोणीही आढळून आले नाही. फ्राईड चिकनचा असा प्रकार पाहून डोकं गरगरेल, VIDEO पाहून नॉनवेज प्रेमीही हैराण या बाळाला सांभाळायचे नसल्याने अज्ञात मातेने हे बाळ बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. बाळ एक ते दीड महिन्याचे असून परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर या बाळाला अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बाळाची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. मात्र हे बाळ का ठेवले याचा शोध अद्याप लागला नसून निर्दयी मातेचा शोध पोलीस घेत आहेत. परळी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. जगावं की मरावं? ही विचित्र डिश पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, पाहा VIDEO प्राथमिक तपासात एक महिला रेल्वे फलाटावर लहान मुलगा हातात घेऊन रेल्वेकडे जात असताना फुटेज मिळून आले आहे . यावरून पोलीस पुढील तपास करत असून लवकरच या निर्दयी मातेचा शोध लागण्याची शक्यता आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: बीड

पुढील बातम्या