Home /News /maharashtra /

नवऱ्याला हवा होता मुलगा, आईने २ मुलींना हौदात बुडवून संपवलं

नवऱ्याला हवा होता मुलगा, आईने २ मुलींना हौदात बुडवून संपवलं

पती नेहमी तू मुलीलाच जन्म का देतेस म्हणून पत्नीस मारहाण करायचा हा त्रास असाह्य झाल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली.

    शशी केवडकर, प्रतिनिधी बीड, 30 आॅक्टोबर : घरगुती भांडणातून पत्नीने दोन चिमुकल्यांना रागाच्या भरात पाण्याच्या हौदात बुडवून मारल्याची ह्रदयद्रावक घटना बीडमध्ये घडली आहे. पती हा मद्यपी असल्याने तो नेहमी तू मुलीलाच जन्म का देतेस म्हणून पत्नीस मारहाण करायचा हा त्रास असाह्य झाल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. 'मुलगा वंशाचा दिवा..'या भ्रमा भोवती कित्येक 'नकोशी'मुलींचा गर्भातच गळा घोटला जातो. तर कुठे गर्भपात करून विल्हेवाट लावली जाते...त्या निष्पाप जीवाचा एवढाच गुन्हा असतो की, ती मुलगी असते...अशाच दोन कवळ्या जीवांचा मुलाच्या नादापायी जीव गेल्याची मन सुन्न करणारी घटना घडलीये. बीड शहरातील नरसोबा नगर भागातील दिपाली राजाराम आमटे या जन्मदाती आईने रागाच्या भरात आपल्या सात महिन्याच्या तसंच साडेतीन वर्षांच्या मुलीस पाण्याच्या हौदात बुडवून मारले. ही घटना पहाटे घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिपालीचा नवरा हा दारूच्या आहारी गेला होता. सात महिन्यापूर्वीच दिपालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दुसरीही मुलगी झाल्यामुळे दोघांमध्ये यावरून वाद व्हायचा. तू पहिल्या मुलीला जन्म दिला आणि त्यानंतरही दुसऱ्यांदा मुलीलाच जन्म दिला यावरुन दोघांमध्ये खटके उडत होते. कधीकधी तर दारूच्या नशेत तो दिपालीला मारहाणही करायचा. सारख्या मुलाच्या तगाद्याला कंटाळलेल्या दिपालीने आज टोकाचे पाऊल उचलले. कुणाच्या ही अंगावर शहार येईल असे या माताने कृत्य केलं. अवघ्या सात महिन्याच्या या मुलीचा हौदात बुडवून जीव संपवला. तिच्या पाठोपाठ मोठ्या मुलीलाही तिने हौदात बुडून संपवले. विशेष म्हणजे या घटनेची मृत मुलीच्या वडिलांना अद्यापही काहीच माहिती नाही. पोलिसांनी दिपालीला ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहे. =======================
    First published:

    Tags: Beed, Crime, Mother, News, बीड

    पुढील बातम्या