तिसरी मुलगी झाली, आईने 10 दिवसाच्या चिमुकलीची गळा दाबून केली हत्या

तिसरी मुलगी झाली, आईने 10 दिवसाच्या चिमुकलीची गळा दाबून केली हत्या

नाशिकमध्ये जन्मदात्या आईनेच गळा दाबून मुलीची हत्या केली.

  • Share this:

नाशिक, 3 जून : तिसरी मुलगी झाली म्हणून आईनेच दहा दिवसाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी अनुजा काळे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगाच हवा या अट्टहासातून अनेकदा स्त्रीभूण हत्येसारखे प्रकार समोर येतात. नाशिकमध्ये तर जन्मदात्या आईनेच गळा दाबून मुलीची हत्या केली. या घटनेनंतर मुलीची हत्या करणाऱ्या पत्नीविरोधात पतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी अनुजा काळे हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तसंच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ माजली. असा क्रूरपणा करणाऱ्या महिलेला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

VIDEO : भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading