Home /News /maharashtra /

आधी 2 वर्षांच्या मुलीला पाण्यात बुडवलं, नंतर आईने गळफास घेतला पण जीव वाचला नंतर...

आधी 2 वर्षांच्या मुलीला पाण्यात बुडवलं, नंतर आईने गळफास घेतला पण जीव वाचला नंतर...

रूपाली यांनी आधी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली.

अकोला, 22 जानेवारी : दोन वर्षाच्या चिमुकलीला पाण्यात बुडून स्वतःला जाळून घेऊन एका मातेनं आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना अकोल्यात घडली आहे. अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गजानन नगरमध्ये घडली. गजानन नगरातील गल्ली नंबर 1 मध्ये राहणारे गिरीधर इंगोले हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.त्यांची पत्नी दोन वर्षाची मुलगी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी जान्हवी ही शेजारी खेळत होती. तर त्यांची सासू बाहेर इंधन आणायला आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी रूपाली इंगोले यांनी सर्वप्रथम मुलीला घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवलं. त्यानंतर रूपाली यांनी आधी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. सासू-सासरे घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोन वर्षाच्या चिमुकली आनंदीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. हा प्रकार मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचा आहे की, या मागील दुसरे काही कारण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे. मुलीची छेड काढली, बापाने 26 वर्षीय तरुणाचा केला खून बदलापुरात दिवसा ढवळ्या एका 67 वर्षाच्या वृद्धाने 26 वर्षीय तरुणाची हत्या केलीय. या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीला सतत त्रास देत असल्याने त्रासलेल्या वडिलांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी हातात सुरा घेऊन जात असतानाचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाल्याचं बोललं जातंय. नामदेव कोइंडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बदलापुरातील शिरगांव भागातील वर्दळीच्या सुरवळ चौकात दुपारच्या सुमारास हा थरार घडला. भर दुपारी सचिन शिंदे या 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे एका 67 वर्षीय नामदेव कोइंडे या वृद्धाने ही हत्या केली. सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. बदलापूर पोलीस ठाण्यातही या आधी हे प्रकरण गेले होते. मात्र, तरी देखील सचिनचा त्रास सुरूच होता. सचिनच्या कृत्याने त्रासलेल्या नामदेव यांनी बदलापुरातील सुरवळ चौकात सचिनची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. विशेष म्हणजे ही हत्या केल्या नंतर नामदेव हा सुरा हातात घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या हत्येची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Akola, Akola crime, Akola news

पुढील बातम्या