आईनं मुलांसह मारली विहिरीत उडी, पण आश्चर्यकारक बचावली चिमुरडी

आईनं मुलांसह मारली विहिरीत उडी, पण आश्चर्यकारक बचावली चिमुरडी

सगणापूर या गावातील एका महिलेनं तिच्या दोन मुलासह विहिरीत उडी घेतली यात विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ,12 डिसेंबर : मारेगाव तालुक्यातील सगणापूर या गावातील एका महिलेनं तिच्या दोन मुलासह विहिरीत उडी घेतली यात विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पण यात एक 3 वर्षांचं मुलगी सुदैवानं बचावली.

मारेगावपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सगणापूर इथं ही घटना घडली. रुपा जुनगरी ही 31 वर्षीय महिला इथं राहत होती.

रूपा जुनगरीने आपला मुलगा लक्ष जुनगरी वय 6 वर्ष आणि 3 वर्षाची चिमुरडी आरोही ला घेऊन शेतातली विहिरीत उडी घेतली.

या महिलेने शेतातील विहिरीत उडी घेतली तेव्हा बाजूच्या शेतात काम करत असलेल्या व्यक्तीला ही बाब लक्षात येताच त्यांनी या सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मात्र यात फक्त आरोहीला वाचवता आलं. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

या महिलेनं मुलांसह आत्महत्या करण्याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मारेगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

=====================================

First published: December 12, 2018, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading