Home /News /maharashtra /

सासू विहिरीत पडली, साडीचा पदर करून सून वाचवत होती, पण तिचाही गेला तोल, मनमाडमधील घटना

सासू विहिरीत पडली, साडीचा पदर करून सून वाचवत होती, पण तिचाही गेला तोल, मनमाडमधील घटना

दुर्दैवीची बाब म्हणजे, मयत मनिषा ही गरोदर होती. तिला एक 8 वर्षाचा मुलगा आणि 6 व 4 वर्षाची मुलगी आहे. मनिषाच्या जाण्यामुळे या तिघांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरवून तिघे ही पोरके झाले आहे.

मनमाड, 27 जुलै : सासू (Mother-in-law) आणि सूनेचं (daughter in law) नातं कसं असतं याची मन हेलावून टाकणारी घटना मनमाडमध्ये (manmad) घडली आहे. पाणी काढताना तोल जाऊन सासू विहिरीत पडल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी गेलेल्या सुनेचा ही सासूसोबत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील पांडुरंग नगर भागात घडली. दुर्दैवीची बाब म्हणजे, सून गरोदर होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग नगर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. गयाबाई अशोक पवार(वय-50) मनीषा सचिन पवार(वय-20) अशी या दोघांची नावे आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. IND vs SL : द्रविड श्रीलंकेच्या कर्णधारासोबत काय बोलला? गुपित उलगडलं! पांडुरंग नगर भागात राहणाऱ्या गयाबाई पवार आणि मनीषा पवार या सासू-सून शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. या विहिरीला कठडा नाही. पाणी काढत असताना अचानक गयाबाईचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. सासू विहिरीत पडल्याचे पाहून मनीषाने आरडाओरडा केला मात्र परिसरात कोणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मनीषाने साडीचा पदर विहिरीत सोडून सासूलावर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करत असताना ती देखील विहिरीत पडली. दोघींना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ATM मधून पैसे काढणं महागणार, डेबिट-क्रेडिट कार्डसाठीही मोजावे लागणार जास्त पैसे बराच वेळ झाला दोघीही घरी परतल्या नाही. त्यामुळे विहिरीजवळ जाऊन पाहिले असता दोघींचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी दोघींचे मृतदेह बाहेर काढले. दुर्दैवीची बाब म्हणजे, मयत मनिषा ही गरोदर होती. तिला एक 8 वर्षाचा मुलगा आणि 6 व 4 वर्षाची मुलगी आहे.  मनिषाच्या जाण्यामुळे या तिघांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरवून तिघे ही पोरके झाले आहे. सासू आणि सूनचा मृत्यू झाल्यामुळे पवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक निरीक्षक गौतम तायडे करीत आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या