Home /News /maharashtra /

लातूर: लेकीच्या प्रसूतीसाठी आली अन् जावयाच्या घरीच केला आयुष्याचा शेवट, टेरेसवर आढळला मृतदेह

लातूर: लेकीच्या प्रसूतीसाठी आली अन् जावयाच्या घरीच केला आयुष्याचा शेवट, टेरेसवर आढळला मृतदेह

Suicide in Latur: लातूर शहरातील रामनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी लेकीच्या प्रसूतीसाठी आलेल्या महिलेनं जावयाच्या घरीच आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

    लातूर, 09 फेब्रुवारी: लातूर (Latur) शहरातील रामनगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी लेकीच्या प्रसूतीसाठी आलेल्या महिलेनं जावयाचं घर असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या (Mother in law commits suicide) केली आहे. मंगळवारी सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित महिलेनं नेमकी आत्महत्या का केली? याची कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. अंतेश्वरी सूर्यकांत चिगळे असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय सासुचं नाव आहे. त्या अहमदपूर तालुक्यातील हाळणी येथील रहिवासी होत्या. त्यांची मुलगी आपल्या पतीसोबत लातुरातील रामनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंतेश्वरी चिगळे या काही दिवसांपूर्वी आपल्या लेकीच्या प्रसूतीसाठी जावयाच्या घरी आल्या होत्या. गेल्या एक महिन्यांपासून त्या येथेच राहत होत्या. हेही वाचा- मुंबईत HIVग्रस्त बापाकडून सावत्र मुलीसोबत विकृतीचा कळस; दररोज करायचा भयंकर कृत्य दरम्यान, मंगळवारी सकाळी चिगळे यांनी जावई राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. हेही वाचा-भावाला आईच्या रुममध्ये झोपायला पाठवलं अन्..; सकाळी भयावह अवस्थेत आढळली तरुणी या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चिगळे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. जावयाच्या घरी राहणाऱ्या सासुबाईने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Latur, Suicide

    पुढील बातम्या