कोल्हापूर, 10 नोव्हेंबर : ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचा विजेच्या तारेचा (electric wire shock) धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना कोल्हापुरात (Kolhapur) घडली आहे. सासू-सुनेच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी गावात ही घटना घडली आहे. मीना विष्णू येडेकर (वय 55) तर अनुराधा महेश येडेकर (वय 27) असे सासू सुनेचे नाव आहे.
आज दुपारी घरातील काम आटोपल्यानंतर मीना आणि अनुराधा येडेकर या दोघी नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी ओढ्याजवळच असलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे जोरदार विजेचा झटका बसला. त्यामुळे दोघांची जागेवरच मृत्यू झाला.
धनंजय मुंडे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती स्थिर
ओढ्याजवळ असलेल्या शेतातील ग्रामस्थांना दोघींचे मृतदेह आढळून आले, त्यामुळे घडलेला सगळा प्रकार समोर आला. या घटनेबद्दल तातडीने ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह ताब्यात घेतले. मृत सासू सुनेचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.
Bihar Election Results : बिहार निवडणुकीत सेनेची 'तुतारी' फूस, भोपळाही फोडला नाही
ग्रामस्थांनी विजेच्या तारेबद्दल महावितरणकडे वारंवार तक्रार केली होती. पण, त्याबद्दल महावितरणने कोणतेही कारवाई केली नाही. सासू-सूनेच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.