• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • mother's day 2021 ला बीडमध्ये दुर्दैवी घटना, 5 वर्षांच्या समर्थला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू

mother's day 2021 ला बीडमध्ये दुर्दैवी घटना, 5 वर्षांच्या समर्थला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ढाकणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Share this:
बीड, 09 मे : जगभरात आज मातृदिवस (mother's day 2021) मोठ्या स्नेहपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. तर बीडमध्ये (Beed) नदीवर कपडे धुण्यासाठी आईसोबत आलेल्या पाच वर्षाच्या मुलाचा नदीकाठी खेळत असताना नदीपात्रात पडला. त्याच्या वाचवण्यासाठी आईने नदीपात्रात उडी घेतली. मात्र या घटनेत आईसह मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई (beed gevrai) तालुक्यातील घडली. मातृदिनाच्या दिवशी मुलाला वाचवता ना आईसह चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी गोकुळ ढाकणे( वय 26)  समर्थ गोकुळ ढाकणे( वय 5) अशी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. गोदावरी नदी काठावरील संगमजळगाव येथील पल्लवी ढाकणे या  दुपारी कपडे धुण्यासाठी गोदापात्रात गेल्या असता पाच वर्षाचा समर्थही आई सोबत गेला होता. पल्लवी या कपडे धूत असताना नदीकाठी खेळणारा समर्थ अचानक पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला त्याला वाचविण्यासाठी आई ने पाण्यात उडी मारली. मात्र, पाणी जास्त असल्यामुळे दोघेही बुडाले. त्यांच्या शेजारी कपडे धुणाऱ्या काही महिलांनी आरडाओरड केली.  मात्र, गावातील तरुण येईपर्यंत पल्लवीसह त्यांचा पाच वर्षाचा समर्थ या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. राज्यावर अस्मानी संकट; घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा हवामान खात्याचा सल्ला यानंतर या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसंच दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. Mutual Funds देतायंत मालामाल होण्याची संधी, सलग दोन महिन्यात झाली मोठी गुंतवणूक ऐन मातृदिनी मुलाला वाचवताना आईचा आणि मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पल्लवी यांना पोहता येत नव्हते. मात्र, पोटचा गोळा बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र, समर्थला वाचविण्यासाठी धडपड कामी आली नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ढाकणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Published by:sachin Salve
First published: