मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रितीने 3 वर्षांच्या लेकीसह साडीने घेतला गळफास, एकाच चितेवर दोघांना अंत्यसंस्कार, अख्ख गाव रडलं!

प्रितीने 3 वर्षांच्या लेकीसह साडीने घेतला गळफास, एकाच चितेवर दोघांना अंत्यसंस्कार, अख्ख गाव रडलं!

यावेळी दीडवर्षांचा मुलगा बसवराज हा अगदी थोडक्यात वाचला. बसवराजला फास व्यवस्थित न बसल्यामुळे त्याचा जीव वाचला.

यावेळी दीडवर्षांचा मुलगा बसवराज हा अगदी थोडक्यात वाचला. बसवराजला फास व्यवस्थित न बसल्यामुळे त्याचा जीव वाचला.

यावेळी दीडवर्षांचा मुलगा बसवराज हा अगदी थोडक्यात वाचला. बसवराजला फास व्यवस्थित न बसल्यामुळे त्याचा जीव वाचला.

  • Published by:  sachin Salve
प्रीतम पंडीत, प्रतिनिधी सोलापूर, 10 ऑगस्ट : सोलापूर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह गळफास (Mother commits suicide ) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेमध्ये मुलगा बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोरवली इथं ही घटना घडली आहे. प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय 25 ), आरोही विजयकुमार माळगोंडे (वय 3) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.  मृत प्रीतीचे पाच वर्षांपूर्वी कोरवळी येथील विजयकुमार माळगोंडे या तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर सुखी संसाराला सुरुवात झाली. दोघेही शेतातील वस्तीत राहत होते. या दोघांना आरोही आणि बसवराज अशी दोन मुलं झाली. सुखी संसार सुरू असताना कुणाची तरी नजर लागली. पती विजयकुमार हा प्रीतीचा छळ करू लागला. या ना त्या कारणावरून विजयकुमार प्रीतीला मारहाण करू लागला. रोज मानसिक छळ सुरू केला. शिवीगाळ करून तो प्रिताला मारहाण करत होता. याच जाचाला कंटाळून प्रीती आणि तिची तिन वर्षांची मुलगी आरोही घरात लोखंडी रॉडला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी दीडवर्षांचा मुलगा बसवराज हा अगदी थोडक्यात वाचला. बसवराजला फास व्यवस्थित न बसल्यामुळे त्याचा जीव वाचला. (वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे मोठा फरक; तुम्ही या चुका तर करत नाही ना?) या घटनेची माहिती समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. प्रितीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत प्रिती आणि तिच्या मुलीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (दैनंदिन राशीभविष्य: या राशीला अनपेक्षित अडचणी आणि नोकरीत त्रास होण्याची शक्यता) मयत प्रितीचा भाऊ मल्लिनाथ मंगरुळे याने पोलिसांना धाव घेतली आणि विजयकुमार याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पती विजयकुमार माळगोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
First published:

पुढील बातम्या