Home /News /maharashtra /

लेकीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईने घेतला गळफास, बीडमधील धक्कादायक घटना

लेकीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आईने घेतला गळफास, बीडमधील धक्कादायक घटना

  सुवर्णा यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुवर्णा यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सुवर्णा यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुवर्णा यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

सुवर्णा यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुवर्णा यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

    बीड, 28 मे : आपल्या लाडक्या लेकीचे थाटामाटात लग्न केलं.  डबडबलल्या डोळ्यांनी तिला निरोप देत पाठवणी केली आणि दुसऱ्याच दिवशी आईने गळफास घेऊन आत्महत्या (Mother commits suicide) केल्याची हृदयद्रावक घटना बीड (beed) शहरातील अंबिका चौक परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुवर्णा सुनील जाधव (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा 26 मे रोजी मोठ्या थाटात पार पडला. सायंकाळी मुलीची सासरी पाठवणी केली. त्यानंतर शुक्रवारी सुवर्णा यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुवर्णा यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (कायमस्वरुपी हसरा चेहरा घेऊन जन्मलं गोंडस बाळ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल) तर घटनेची माहिती कळताच, बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून नेमकी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान मयत जाधव कुटुंबातील कोणीही पोलीस ठाण्यात न गेल्यानं, अद्यापही आत्महत्याची नोंद ठाण्यात झाली नसून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. छेडछाडीला कंटाळून शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या दरम्यान, हिंगोलीत एका शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीने पाठलाग आणि छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिंनीची गावातील दोन टवाळखोर युवक हे शाळेत जाताना व शेतात जाताना पाठलाग करून छेडछाड करत होते. (सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; अॅक्शन, फॅमिली ड्रामा) अजय समाधान इंगोले आणि शिवाजी पांढरे अशी या युवकांची नावं आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून या अल्पवयीन विद्यार्थिनीने उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आपले जीवन संपवलं. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेवर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या