कोरोनामुळे आई आणि मुलाची ताटातूट, प्रसुती झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये झाले वेगळे

कोरोनामुळे आई आणि मुलाची ताटातूट, प्रसुती झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये झाले वेगळे

उपचार घेणाऱ्या या मातेला परिचारिकांनी व्हिडिओ कॉल करून बाळाला पाहण्याची संधी दिली.

  • Share this:

बीड, 8 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटात प्रसुतीनंतर मातेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर तान्हुल्याचा निगेटिव्ह. त्यामुळे बाळाला आईपासून अवघ्या काही तासात दूर व्हावे लागले. आई रुग्णालयात तर बाळ घरी... या ताटातूट झालेल्या माय लेकराची कोव्हिड वार्डातील परिचारिकांनी भेट घडवून आणली. व्हिडीओ कॉल करून आईने तान्हुल्याला डोळे भरून पाहिले. यावेळी मायेचा पान्हा फुटला तर गहिवरून डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

गेवराई तालुक्यातील एक 20 वर्षीय महिलेची 28 जुलै रोजी दुपारी 1 वाजता गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र तिची तपासणी केली असता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर बाळ निगेटिव्ह आले. बाळाला संसर्ग होऊ नये, यासाठी त्याला घरी नेण्यात आले होते. तर आईवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

असे असले तरी आपल्या तान्हुल्यापासून आईला दूर राहणे कठीण होत होते. त्याला कधी पाहीन आणि कुशीत कधी घेईल अशी ओढ आईला लागली. मात्र काळजीपोटी मन मारून उपचार घेणाऱ्या या मातेला परिचारिकांनी व्हिडिओ कॉल करून बाळाला पाहण्याची संधी दिली. जन्मानंतर काही तासात दुरावलेल्या बाळाला पाहताना आईचे डोळे भरून आले.

पोटच्या गोळ्याला पाहण्याची इच्छा असतानाही कोरोनामुळे त्याच्यापासून दुरावलेल्या या मातेला मात्र परिचारिकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे व्हिडिओ मन भरून आलं.आपल्या चिमुकल्याला कुशीत घेण्यासाठी तिला घरी जाण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र कोरोनामुळे काही दिवस मातेला हा विरह सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Akshay Shitole
First published: August 8, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading