मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाशिम : भरधाव ट्रक काळ बनून आला; मायलेकाचा हृदय हेलावून टाकणारा अंत

वाशिम : भरधाव ट्रक काळ बनून आला; मायलेकाचा हृदय हेलावून टाकणारा अंत

मेडशी येथील चंद्रकला करवते आणि त्यांचा मुलगा वसंत करवते हे दोघे  शेलू बाजारकडून कारंजाच्या दिशेने जात होते. इतक्यात पुढील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली (Washim Road Accident)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Washim, India
  • Published by:  Kiran Pharate

किशोर गोमाशे, वाशिम 19 सप्टेंबर : जिल्ह्यातील नागपूर - संभाजीनगर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारंजा - शेलूबाजार दरम्यानच्या वाई फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या घटनेत दुचाकीवर मायलेक चिरडले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

खारघरमध्ये शिंदे गटाचे रुपेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, सीसीटीव्हीत मारहाण कैद, पाहा VIDEO

मेडशी येथील चंद्रकला करवते आणि त्यांचा मुलगा वसंत करवते हे दोघे शेलू बाजारकडून कारंजाच्या दिशेने जात होते. इतक्यात पुढील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही मायलेक ट्रकखाली चिरडले गेले. ही धडक इतकी जबर होती की या घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील नागपूर - संभाजीनगर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. तीन दिवसात या महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याजवळ शिवशाही बसचा मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर

पुण्याजवळ शिवशाही बसचा अपघात -

पुण्यातूनही एक अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या उरुळी देवाची इथे शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात मध्यरात्री झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Accident, Bike accident