मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आई पाठोपाठ लेकीलाही कोरोनानं हिरावलं, दोघींचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ

आई पाठोपाठ लेकीलाही कोरोनानं हिरावलं, दोघींचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ

आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिंदे कुटुंबीयांवर आली आहे. सुकृता असं मुलीचं नाव असून तिनं पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केली होती.

अहमदनगर, 16 जून : राज्यासह देशात कोरोना रुग्णसंख्या (Corona in India) कमी होत असली तरी आजही कोरोनाबाबत गाफील राहणं महागात पडू शकतं. अहमदनगर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीनं देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शिंदे कुटुंबीयांवर आली आहे. सुकृता असं मुलीचं नाव असून तिनं पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केली होती. सुकृता ही अकोले तालुक्यातील पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. (mother and daughter death due to corona infection Akole)

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिता शिंदे यांचे आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळं निधन झाले होते. माय-लेकीचे पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेचे नागरीक सुन्न  झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर महाविद्यालयात सुकृताने गेल्या वर्षी घवघवीत यश मिळविले होते. जागतिक महिला दिनावेळी आणि इतरवेळीही महिलांना कायदे विषयक जनजागृतीपर तिचे लेख प्रसिद्ध झाले होते. अकोले तालुक्यामध्ये पहिली महिला पत्रकार म्हणून ती वाटचाल करू लागली होती. सुकृताने एम.ए मराठीचे देखील शिक्षण घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने डी.एड अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तिने डी. एडची पदविका संपादन केल्यानंतर तिला पत्रकारिता विषयाची विशेष आवड होती. त्यामुळे तिने पत्रकारिता अभ्यासक्र पूर्ण केला.

हे वाचा - मुंबईतील पॉश सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याची भीती; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

सुकृता हिचे अलिकडेच लग्न जमले होते. मध्यंतरी साखरपुडा झाला होता, तिचा होणारा पती आणि त्यांचे कुटुंबदेखील तिची काळजी घेत होते. रात्री तिची प्रकृती जास्त खालावली. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पण तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. 4 मे 2021 रोजी तिचा विवाह  होणार होता. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला होता. आता तिच्या हातावर मेहंदी लागण्याआधीच ती सर्वांना सोडून निघून गेलीय.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Coronavirus