मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आई, पप्पाकडे चलायचं', पतीच्या निधनानंतर मायलेकीने संपवलं आयुष्य, डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट

'आई, पप्पाकडे चलायचं', पतीच्या निधनानंतर मायलेकीने संपवलं आयुष्य, डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट

ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे.

ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे.

ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे.

नाशिक, 02 ऑक्टोबर : कोरोनाची (corona) लाट ओसरली असली तरी तिच्या वेदना अजूनही कायम आहे. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यानंतर एका आईने आपल्या लहान मुलीसह आत्महत्या (Mother and daughter commit suicide) केल्याची मन हेलावून टाकणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सुजाता प्रवीण तेजाळे (sujata tejale) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर अनया असं मुलीचं नाव आहे. सुजाता यांचे पती प्रवीण पंडित तेजाळे यांचं पाच महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. पतीच्या निधनानंतर सुजाता एकट्या पडल्या होत्या.  तेव्हापासून त्या  प्रचंड निराशा आणि अडचणींचा सामना करीत होत्या. 'आई, पप्पा कधी येतील' असं अनया सतत आईला विचारल होती. तिच्या या निरास प्रश्नाला सुजाता यांच्याकडे उत्तर नव्हते. अखेर त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीसह गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

सुजाता यांच्या आत्महत्येनंतर घरात एक सुसाईट नोट सापडली आहे. ही सुसाईट नोट वाचून सर्वच जण गहिवरून गेले.

सुजाता  तेजाळे यांची सुसाईड नोट

मी सुजाता प्रवीण तेजाळे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. पत्रास कारण की, माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनात गेले तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखा आहे. आयुष्य खूप मोठं असतं पण एकट्याने राहण्यात अर्थच नाही. ना कुणाशी बोलण्याची इच्छा ना कुणाला भेटण्याची इच्छा होते. परंतु इतके दिवस फक्त मुलीसाठी कसेतरी आयुष्य काढत होते. सध्या ती खूप लहान आहे पुढे तिचे देखील आयुष्य आहे. परंतु तिलाही पप्पांची सतत आठवण येते पप्पा देवाघरी गेले आहे हे, मी तिला काही दिवसांपूर्वी समजावून सांगितलं, पूजा केल्यानंतर पप्पा येतील हे मी तिला समजावून सांगितल्यानंतर काही दिवस ती शांत राहिली. आता मात्र पुन्हा ती सतत पप्पा कधी येणार हा एकच प्रश्न मला विचारत राहते, मी पूजा केली तरीही पप्पा काय येत नाही.

आली लग्नघटिका समीप! सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO

या तिच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ , आज सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक ती मला म्हणाली, 'मम्मी पप्पा नाही तर तू पण दुःखी राहते मी पण sad  राहते, आपण पप्पांकडे जाऊयात' तिच्या या प्रश्नावर मी आज खूप विचार केला. जर पुढे मलाच काही झालं तर तिचं काही होईल तिला सोडून जाणं शक्य नाही. म्हणून तिच्या त्याप्रमाणे मीही करणार आहे, आमच्या दोघींच्या आयुष्यात आता सुख नाही आयुष्यात जगण्यासाठी पैसा सर्व काही नसतो, असं आयुष्य काढणं खूप कठीण आहे. जसा जन्म देताना त्रास झाला तसं थोडं मन घट्ट करुन हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की, आपण आता पप्पांकडे चाललो आहोत. अशी समजूत काढत आमचे आयुष्य मी आता संपत आहे. ह्यात मी जन्म देती वैरीण नाही. ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे. बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही'

पवारांनी गाठल MLA निलेश लंकेंच घर, छोट्या खोलीत खुर्चीवर बसून कुटुंबाची विचारपूस

पोलीस तपासात घरात मिळालेल्या या सुसाईड नोट मन सुन्न करणारी आहे. कोरोनामध्ये अनेक कुटुंब संपली आणि आजची ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.

First published:

Tags: नाशिक