Home /News /maharashtra /

ज्या साडीचा पदर धरून चालणार त्याच साडीने घेतला जीव, 3 वर्षाच्या लेकीला आईनेच दिला गळफास

ज्या साडीचा पदर धरून चालणार त्याच साडीने घेतला जीव, 3 वर्षाच्या लेकीला आईनेच दिला गळफास

अगदी क्षुल्लक कारणामुळे तिने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं.

    किशोर गोमासे, प्रतिनिधी वाशिम, 07 जानेवारी : माता न तू वैरिणी असं म्हणण्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे.  आपल्या पोटच्या 3 वर्षीय लेकीला  एका आईने गळफास दिल्याची मन सुन्न करणारी घटना मंगरुळपिर तालुक्यातील जनुना शिवारात घडली आहे. मंगरुळपीर तालुक्याच्या जनुना गावातील अमोल भगत आणि गायत्री भगत या दाम्पत्याला तीन मुली होत्या. सर्वात मोठी समीक्षा भगत ( 8 ), मधली तनीक्षा भगत ( 3 ) आणि लहानी प्रांजली भगत ( 2 ) अशी त्यांची नावे आहेत.आज जिल्हा परिषेदेसाठी मतदान होत असल्याने गायत्री भगत या महिलेचा पती अमोल भगत हा मतदानासाठी जात असतांना त्यानं गायत्रीला स्वयंपाकाविषयी विचारलं होतं. त्याचा राग मनात ठेवून तिने मुलगी तनिक्षा भगत ( 3 )ला सोबत घेऊन मतदान करायला जाते म्हणून निघाली. गावाबाहेर गेल्यानंतर या निर्दयी आईने आपला राग लेकीवर काढला. रस्त्यालगत असलेल्या एका झाडाला तिने  पोटच्या लेकीला साडीने गळफास दिला. गळफास देऊन मुलीचा मृत्यू होईपर्यंत ती तिथेच उभी होती. काही क्षणात 3 वर्षांच्या तनिक्षाने जीव सोडला. तनिक्षाने जीव सोडल्यानंतर गायत्री भानावर आली. आपल्या हातून काय घडलं हे पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे गायत्रीने त्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नेमकं त्यावेळी गावकरी धावून आल्याने तिचा प्रयत्न फसला. अगदी क्षुल्लक कारणामुळे तिने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं. गायत्री भगत ही महिला अधून मधून मानसिक रोगी असल्यागत वागत असल्याचं गावकऱ्यांमध्ये चर्चा होती. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला आहे. गायत्री भगत या आईने पोटच्या मुलीला का गळफास देऊन मारले, याचा तपास मंगरुळपिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद दिघोरे हे करत आहेत. केवळ पतीनं विचारलं म्हणून या महिलेनं आपल्या मुलीला फाशी देऊन मारल्याने आई मुलीच्या नात्याला काळीमा फासल्या गेली असून माता न तू वैरीणी अशी म्हणण्याची वेळ या घटनेमुळे येऊन ठेपली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Washim, WASHIM NEWS

    पुढील बातम्या