अहमदनगर, 2 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण देशात सर्वाधित प्रकोप पाहायला मिळत असलेल्या जिल्ह्यांपैकी अहमदनगर हा एक जिल्हा आहे. जिल्हायात रोज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या समोर येत असतानाच, शुक्रवारी तर जिल्ह्यातील आकडेवारीने आणखी मोठा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीत एका दिवसांत अहमदनगरमध्ये तब्बल 1800 कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. (Ahmednagar corona blast)
वाचा - कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची तयारी सुरू, किती दिवसांनी घ्यावी लागणार?
देशात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होत असलेल्या पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्याचा विचार करता, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्याचं प्रमाण गेल्या चार पाच दिवसांत अधिकच वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 1300 वर असलेला आकडा गुरुवारी 1600 तर शुक्रवारी थेट 1800 वर जाऊन पोहोचला जिल्ह्यामध्ये राहता तालुक्याला सद्या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Most corona positive cases found on friday in Ahmednagar) गेल्या पाच दिवसांचा प्रामुख्यानं विचार केला असता, 6674 जणांना कोरोनाची लागण झाली असून या पाच दिवसांत 30 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. त्यामुळं परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचं दिसून येत आहे.
वाचा - Pune Lockdown: पुण्यात PMP सह हॉटेल, मॉल 2 आठवड्यांसाठी बंद; नवे नियम जारी
पाच दिवसांत अशी वाढली संख्या
- 28 मार्च - 1228 रुग्ण - 00 मृत्यू
- 29 मार्च - 1347 रुग्ण - 03 मृत्यू
- 30 मार्च - 1100 रुग्ण - 10 मृत्यू
- 31 मार्च - 1680 रुग्ण - 13 मृत्यू
- 01 एप्रिल - 1319 रुग्ण - 04 मृत्यू
- 02 एप्रिल - 1800 -
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगरमध्ये प्रशासन सर्वप्रकारे प्रयत्न करताना दिसत आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. मात्र गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांतील आकडे पाहता परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Corona hotspot, Corona spread