Home /News /maharashtra /

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य मंत्र्यांकडून दिलासादायक माहिती

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य मंत्र्यांकडून दिलासादायक माहिती

राज्यातील हॉटस्पॉटची संख्याही कमी झाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

    मुंबई, 22 एप्रिल : राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 5649 पर्यंत पोहोचली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील मृत्यूदर कमी झाल्याची माहिची आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या संवादात दिली. नागरिकांना घाबरुन जाण्याची गरज नाही तर कोरोनावर (Covid -19) नियंत्रण आणलं जात असल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील हॉटस्पॉटची संख्या कमी झाल्याचेही सांगितले. सध्या राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव येथे हॉटस्पॉट असून ही संख्या कमी झाली आहे. सर्वाधिक चांगली बाब म्हणजे सध्या राज्यात केवळ 1 टक्के रुग्ण गंभीर आहेत. तर उरलेल्या 83 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत मात्र त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 13 टक्के इतके आहेत. आज मुंबईत 154 रुग्णांची संख्या वाढली असून आतापर्यंत कोरोनाचा आकडा 3683 पर्यंत पोहोचला आहे. राज्यात 38 लॅब टेस्टिंग सेंटर्स आहेत. तेथे दररोज 7000 हून अधिक तपासणी केली जाते. आज राज्यातून 789 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्याकडे पुरेशी चाचणी किट उपलब्ध असून 1 टक्के गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. अद्याप फार रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही. सध्या राज्यात 5649 रुग्ण आहेत. राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. यावेळी टोपे म्हणाले,' माझे सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना आवाहन आहे की, त्यांनी काळजी करू नका. रुग्ण ठणठणीत बरा होऊनच परतेल. मात्र व्हॉट्सअॅपवरील माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत ठिकाणाहून माहिती घ्यावी.' संबंधित -हे लोक उपाशी का आहेत? लेकीच्या निष्पाप प्रश्नाने हेलावला शेतकरी; अशी केली मदत चीनमध्ये 2 महिन्यांनंतरही शरीरात व्हायरस जिवंत, बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोना
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या