मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मार्निंग वॉक ठरला शेवटचा, इनोव्हा कारच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू

मार्निंग वॉक ठरला शेवटचा, इनोव्हा कारच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू

अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर  दुसऱ्या महिलेला कारने 50 मीटर फरफटत नेले.

अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर दुसऱ्या महिलेला कारने 50 मीटर फरफटत नेले.

अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर दुसऱ्या महिलेला कारने 50 मीटर फरफटत नेले.

जळगाव, 04 फेब्रुवारी : पाचोरा इथं इनोव्हा गाडीच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) निघालेल्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

आज सकाळी 5  ते 5.30 वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. सामनेर ता. पाचोरा येथील महिला नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज ग्रामस्थ सकाळी मॉर्निंगसाठी जात असतात.

काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, विधानसभा अध्यक्षपदासाठी 3 नेत्यांची नावं चर्चेत!

यावेळी सकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनिषा साहेबराव पाटील (वय - 50) अनिता शहादु पाटील (वय 48) या दोघी महिला मॉर्निंग वॉक करून परत असताना इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच गतप्राण झाल्या.

पेट्रोल-डिझलेच्या किंमतीत आज पुन्हा वाढ, वर्षभरात 14 रुपयांनी महागलं इंधन

अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर  दुसऱ्या महिलेला कारने 50 मीटर फरफटत नेले. दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले. असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे ,पोलीस हवालदार रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहे

First published:
top videos