मुंबई, 19 एप्रिल : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत असताना आज राज्यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आज कोरोनाने (Covid - 19) मोठ्या संख्येने डोकं वर काढलं आहे. आज राज्यात एका दिवसात तब्बल 552 रुग्णांची संख्या वाढली असून एकूण बाधितांची संख्या 4200 वर पोहोचली आहे. गेल्या अनेक दिवसांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे.
आज राज्यात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत काही टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे दिसत होते. मात्र आज मोठ्या आकड्याने कोरोनाने डोकं वर काढलं आहे. राज्यात 4200 रुग्णसंख्या झाली असून मुंबईत 2723 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज बारा मृत्यूंपैकी मुंबईत 6, मालेगाव येथील 4, सोलापूर मनपा क्षेत्रातील एक, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील एक असे आहेत. आजपर्यंत 72, ०23 नमुने तपासण्यात आले असून त्यातील 66 हजार 673 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 4200 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आज दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 135 रुग्ण आढळून आलेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 2798वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 131 जणांचा मृत्यू झालाय. आज 29 जण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांचा आकडा 310वर गेला आहे. मृतांमध्ये आज एका 26 वर्षीय महिलाचाही समावेश आहे. तिला थायरॉईडचा त्रास होता अशी माहिती दिली जात आहे. म्हणजे फक्त वृद्ध नाही तर तरुणांना काही आधीच वेगळे आजार असतील आणि करोना झालं तर ते धोकादायक ठरू शकतं हे समोर आलं आहे.
संबंधित -आनंदाची बातमी! गोवाही झालं कोरोनामुक्त, 3 एप्रिलनंतर एकही रुग्ण नाही
गृहमंत्रालयाने जारी केली नवी गाईडलाइन, संसर्ग नसल्यास मजुरांची कामावर रवानगी
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे