मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

PM मोदींनी लॉकडाऊन वाढवल्यानंतर मजुरांनी फोडला टाहो, ठाण्यात रस्त्यावर उतरले परराज्यातील हजारो जण

PM मोदींनी लॉकडाऊन वाढवल्यानंतर मजुरांनी फोडला टाहो, ठाण्यात रस्त्यावर उतरले परराज्यातील हजारो जण

आम्हाला आमच्या गावी परत पाठवा, अशी मागणी करत हजारो मजूर ठाण्यातील मुंब्रा भागात रस्त्यावर उतरले आहेत.

आम्हाला आमच्या गावी परत पाठवा, अशी मागणी करत हजारो मजूर ठाण्यातील मुंब्रा भागात रस्त्यावर उतरले आहेत.

आम्हाला आमच्या गावी परत पाठवा, अशी मागणी करत हजारो मजूर ठाण्यातील मुंब्रा भागात रस्त्यावर उतरले आहेत.

ठाणे, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या निर्णयानंतर आपल्या घरी जाण्यासाठी आसुसलेल्या परराज्यातील मजुरांनी एकच टाहो फोडला आहे. आम्हाला आमच्या गावी परत पाठवा, अशी मागणी करत हजारो मजूर ठाण्यातील मुंब्रा भागात रस्त्यावर उतरले आहेत. मुंब्रा नाका येथे कामगार आणि परराज्यातील मजुरांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. त्यांना इथे रहायचे नसून आपल्या गावी परत पाठवा असा आरडा ओरडा हे कामगार करु लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आणि त्यामुळे लॉकडाऊन वाढवला गेला. मात्र त्यामुळे एकतर कोरोना होण्याची भीती आणि दुसरे म्हणजे काम काम मिळत नसल्याने उपासमारीचे सकंट अशा दुहेरी अडचणीत मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात असलेले उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील नागरीक अडकून पडले आहेत. लॉकडाऊन वाढल्यानंतर आता जीव जगावण्यासाठी करायचे तरी काय, असा प्रश्न या सर्वांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे मुंब्र्यात हजारो मजूर आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांना पोलिसांनी शांत केले असून सरकारने काही उपाययोजना केल्या तर तुम्हाला कळवलं जाईल, असं सांगून त्या मजूरांना परत त्यांच्या लॉकडाऊनच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. लॉकडाऊन वाढवला पण 20 एप्रिलनंतर शिथिल होणार नियम '20 एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल...मात्र त्यालाही काही नियम व अटी असतील,' अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत काही भागांत शिथिलता आणणार असल्याचं म्हटलं असलं तरीही एक इशाराही दिला आहे. हेही वाचा- वीटभट्टीवर पोहोचला कोरोना, 3 वर्षाच्या मुलीला झाली लागण, अनेकजण संपर्कात आल्याने खळबळ 'गरिबांसाठी, हातावर पोट असणाऱ्यांसाठी या लॉकडाऊनमध्ये 20 एप्रिलनंतर सुरक्षितता असेल त्या ठिकाणी सवलत असेल. रब्बीची पीक काढणी सुरू आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे. पण बेजबाबदारपणा केला तर सवलती काढून घेण्यात येतील,' असं नरेंद्र मोदी म्हणाले. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Thane news

पुढील बातम्या