Home /News /maharashtra /

घाबरु नका! राज्यातील 50000 हून अधिक कोरोनाबाधित झाले बरे; मृत्यूचा आकडा मात्र चिंता वाढवणारा

घाबरु नका! राज्यातील 50000 हून अधिक कोरोनाबाधित झाले बरे; मृत्यूचा आकडा मात्र चिंता वाढवणारा

सकारात्मक विचार, नियमित औषधं व काही नियम पाळले तर कोरोनाला हरवणं सहज शक्य आहे. यासाठी नागरिकांनी अधिक सजग राहणं गरजेचं आहे.

    मुंबई, 14 जून : महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे. अशातच राज्यात आतापर्यंत 50000 हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची चांगली बातमी समोर आली आहे. आज राज्यातून 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 50978 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज 3390 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृत्यूचा आकडा 120 असल्याने ही संख्या भीती वाढवणारी आहे. सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,07,958 पर्यंत पोहोचली आहे. राज्यात आज एकूण 53017 Active रुग्ण आहेत. मुंबई महानगरपालिकेत 58226 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून आतापर्यंत 26986 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत येथे 2182 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून येथील कोरोनाबाधितांची संख्या 12184 पर्यंत पोहोचली आहे. पुण्यात आतापर्यंत 480 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आज दिवसभरात 320 रुग्ण आढळले तर 9 जणांचा मृत्यू झाला असून आज येथील 123 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. हे वाचा-नोव्हेंबरमध्ये ठरवलं होतं सुशांत सिंहचं लग्न? नातेवाईकांनी केला मोठा खुलासा भाजपचे चाणक्य आता कोरोनाला रोखणार; चार IAS अधिकाऱ्यांना केलं पाचारण संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या