पुण्यात चाललंय काय? पोलिसांनी जप्त केले सव्वा दोनशे कोयते

पुण्यात चाललंय काय? पोलिसांनी जप्त केले सव्वा दोनशे कोयते

पुण्यात सव्वा दोनशे कोयते आणि इतर धारदार शस्त्रे जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल.

  • Share this:

पुणे, 31 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात गुन्हेगारांकडून शहरात दहशत माजवण्यासाठी कोयत्यांचा वापर केला जात आहे. बुधवारी रात्री दहशत माजवणाऱ्या गँगने भर रस्त्यावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली.

या घटनेच्य़ा पार्श्वभूमीवर गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वाढता वापर रोखण्यासाठी कोयता विक्रेत्यांवरच कारवाई केली. यात सव्वा दोनशे कोयते आणि इतर धारदार शस्त्रे जप्त केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्या वर्षाच्या सुरूवातीपासून पुण्यात लुटमारी, खून आणि दहशतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यात सर्वाधिक कोयत्याचा वापर होत असल्याने पोलिसांनी कोयता विक्रेत्यांवरच कारवाईचा बडगा उगारला. मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात कोयता सहजपणे मिळत असल्याने त्याचा वापर सर्रासपणे केला जात आहे.

पुणे पोलिसांनी आर्म अॅक्टनुसार कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या अॅक्टनुसार कोयत्याच्या ठरलेल्या आकारापेक्षा मोठे कोयते विक्री करता येत नाहीत. मात्र तरीही जुन्या बाजारात मोठे कोयते विकले जात होते.

First published: January 31, 2019, 10:55 AM IST

ताज्या बातम्या